AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच्या प्रेमात होती करीना कपूर, लग्नापर्यंत नाही पोहोचलं नातं, कारण…

शाहिद कपूर नाही तर, 'या' श्रीमंत व्यक्तीचा मुला होता करीना कपूर हिचं पहिलं प्रेम... खुद्द बेबोने सांगितलं आयुष्यातील 'त्या' व्यक्तीचं महत्त्व... सध्या सर्वत्र करीनाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Kareena Kapoor | श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच्या प्रेमात होती करीना कपूर, लग्नापर्यंत नाही पोहोचलं नातं, कारण...
| Updated on: Jul 03, 2023 | 4:08 PM
Share

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. करीना कपूर खान कुटुंबाची सून असली तरी, एक काळ असा होता जेव्हा करीना हिचं नाव अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांसोबत जोडण्यात आलं. करीना हिने पंकज कपूर – निलीमा आझमी यांचा मुलगा आणि अभिनेता शाहिद कपूर याला डेट केलं आहे. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. शाहिद कपूर याच्यासोबत असलेलं करीनाचं नातं अभिनेत्रीची आई बबिता कपूर आणि बहीण करिश्मा कपूर यांना मान्य नव्हतं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. आज जरी करीना तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असली तरी, एक काळ असा होता, जेव्हा शाहिद कपूरच नाही तर, एका श्रीमंत व्यक्तीच्या प्रेमात अभिनेत्री अडकली होती.

एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. करीना कपूर पहलाज निहलानी यांचे पूत्र विकी निहलानी याच्या प्रेमात होती. विकी निहलानी याने १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘आज के शहंशाह’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विकी निहलानी प्रसिद्ध सिनेमा निर्माते पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) यांचा मुलगा आहे.

विकी निहलानी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री करीना कपूर हिने मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती, ‘विकी निहलाना आणि मी चांगले मित्र होतो. तो कायम कोणत्याही परिस्थितीत माझ्या बाजूने उभा राहायचा. वयाच्या १३ वर्षी मी विकीवर प्रेम करू लागली होती. पण तेव्हा लग्नाचा आमचा कोणताही विचार नव्हता…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

लहानपणी झालेलं प्रेम पुढे जावून अधिक घट्ट झालं नाही. विकी आणि करीना त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात फार पुढे गेले. अखेर विकी निहलानी याने इटालियन मुलगी जस्टिन (Justine Rumeau) हिच्यासोबत लग्न केलं. तर २०१२ मध्ये करीना कपूर हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना दोन मुलं आहेत. तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. तैमूर आणि जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर आणि जेह सेलिब्रिटी किड्स म्हणून प्रसिद्ध आहेत..

करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर,अभिनेत्री गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.