AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hrithik Roshan चा गर्लफ्रेंड सबा आझादसोबत खास फोटो; अभिनेत्याची पहिली पत्नी कमेंट करत म्हणाली…

घटस्फोटानंतर हृतिक रोशनने धरला सबा आझाद हिचा हात; पहिल्या पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून सुझान खान म्हणाली... अभिनेत्याचा गर्लफ्रेंडसोबत फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Hrithik Roshan चा गर्लफ्रेंड सबा आझादसोबत खास फोटो; अभिनेत्याची पहिली पत्नी कमेंट करत म्हणाली...
| Updated on: Apr 05, 2023 | 11:04 AM
Share

मुंबई : सध्या सर्वत्र उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च (NMACC)ची चर्चा तुफान रंगली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड आणि राजकारणातील व्यक्तीनी देखील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. अंबानींच्या कार्यक्रामाचं निमित्त साधत सेलिब्रिटीची एकापेक्षा एक स्टाईल याठिकाणी पाहला मिळाली. कार्यक्रमात अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याने देखील गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad)हिच्यासोबत हजेरी लावली. दोघांना एकत्र पाहताच प्रत्येकाची नजर त्यांच्यावर येवून थांबली. कार्यक्रमातील काही फोटो अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र हृतिक आणि सबा यांच्या फोटोची चर्चा सुरू असताना अभिनेत्याची पहिली पत्नी सुझान खान हिने देखील दोघांच्या खास फोटोवर कमेंट केली आहे. NMACC कार्यक्रमात सबा लाल रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसली तर, हृतिक देखील सूट-बूटमध्ये रुबाबदार दिसत होता. दोघांनी एकमेकांसोबत रोमाँटिक पोझ देत फोटोशूट केलं आहे.

हृतिकने इन्स्टाग्रामवर सबासोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘विद लेडी इन रेड…’ असं लिहिलं आहे. दोघांच्या फोटोवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. हृतिक आणि सबा यांच्या फोटोंवर अभिनेत्याची पहिली पत्नी सुझान खान हिने देखील कमेंट केली आहे. सुझान हिने दोघांच्या फोटोवर परफेक्ट आयकॉन असलेला इमोजी कमेंट केला आहे. सध्या सर्वत्र हृतिक, सबा आणि सुझान यांची चर्चा सुरु आहे.

हृतिक आणि सुझान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर अनेक वर्ष एकमेकांना साथ दिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांचं घटस्फोट झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुझान आणि हृतिक यांना दोन मुलं आहेत. घटस्फोट झाला असला तरी दोघे मुलांसाठी कायम एकत्र येतात.

घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. घटस्फोटानंतर हृतिक सबा आजाद हिला डेट करत आहे, तर दुसरीकडे सुझान अभिनेता अर्सनाल गोनी (Arslan Goni) याला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. (Sussanne Khan dating Arslan Goni)

महत्त्वाचं म्हणजे सुझान खान, अर्सनाल गोनी, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. सबा आण हृतिक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरच्या माध्यमातून झाली. आता दोघे लग्नबंधनात कधी अडकतील अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?