मी चूक केली…; स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप! सर्वांसमोर एकमेकांच्या चुका मोजल्या

कलर्स टीव्हीचा नवा शो 'पती पत्नी और पंगा' सध्या चर्चेत आहे. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जोडप्यांच्या रियालिटी शोमध्ये स्वरा भास्कर आणि फहाद अहमद पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मी चूक केली...; स्वरा भास्करला फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप! सर्वांसमोर एकमेकांच्या चुका मोजल्या
Swara bhaskar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 25, 2025 | 12:31 PM

कलर्स टीव्हीचा नवा रियालिटी शो ‘पती पत्नी आणि पंगा’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर ग्लॅमर विश्वापासून पूर्णपणे दूर गेलेली स्वरा भास्कर पहिल्यांदाच फहाद अहमदशी लग्नानंतर प्रेक्षकांसमोर येत आहे. ती ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये पती फहाद अहमदसोबत सहभागी होत आहे, ज्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वरा ‘मी चूक केली’ असे बोलताना दिसत आहे.

‘पती पत्नी आणि पंगा’ हा बहुप्रतिक्षित रियालिटी शो मुनव्वर फारुकी आणि सोनाली बेंद्रे होस्ट करत आहेत. या शोमध्ये अविका गौर तिच्या होणारा नवरा मिलिंद चांदवानीसोबत सहभागी होत आहे. तसेच हिना खान तिचा पती रॉकी जयसवालसोबत आणि गुरमीत चौधरी पत्नी देबिना बॅनर्जीसोबत दिसणार आहे. या सर्व जोडप्यांचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. यापैकी स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या प्रोमोला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

वाचा: फक्त ऑनलाईन पेमेंट करायचा, QR Code स्कॅन करायचा अन् दुकानदार… असं काय घडायचं? कसा बनला तो श्रीमंत?

पती फहादने उघडला स्वराच्या तक्रारींचा पिटारा

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या प्रोमोमध्ये दोघे ढोल वाजवताना दिसत आहेत. स्वरा ढोल वाजवत एंट्री करताना दिसत आहे, तेव्हा फहाद अहमद म्हणतो की या बाईला ढोलशी इतके प्रेम आहे की, लग्नाच्या वेळी तिने सरकारी कार्यालयात ढोल वाजवला होता, ज्यामुळे लग्न लावणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाली. पतीची तक्रार ऐकून स्वरा म्हणते की, हा तर भांडण करण्याच्या मूडमध्ये आहे आणि आता तिला वाटतंय की इथे येऊन तिने चूक केली. यावर फहाद म्हणतो, “तुम्ही लोक इथे मला शांत बसू देऊ नका.” स्वरा पुन्हा म्हणते, ‘मी मोठी चूक केली.’

रुबिना आणि अभिनवची केमिस्ट्री दिसली

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांचा प्रोमोही खूपच रंजक आहे. या जोडीची प्रेमळ नोंक-झोंक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मुनव्वर फारुकी अभिनवला विचारतो की, लग्नापूर्वी त्यांच्याकडे किती पर्याय होते, यावर रुबिना खूपच मजेदार उत्तर देते. या लोकप्रिय जोडीची जबरदस्त केमिस्ट्री खूपच शानदार वाटते आणि ती प्रेक्षकांना खूप आवडत आहे.