Taapsee Pannu: पत्रकारावर भडकली तापसी पन्नू; नेमकं असं काय घडलं?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Sep 14, 2022 | 4:30 PM

तिच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'योग्य उत्तर दिलंस' असं एकाने म्हटलं. तर 'समिक्षण पचवण्याची ताकद नसेल तर चित्रपट बनवू नकोस', असं दुसऱ्याने लिहिलं. 'ही नेहमीच इतक्या रागात का असते', असाही सवाल एका नेटकऱ्याने केला.

Taapsee Pannu: पत्रकारावर भडकली तापसी पन्नू; नेमकं असं काय घडलं?
Taapsee Pannu
Image Credit source: Instagram

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या बिनधास्त अंदाजासाठी चर्चेत असते. सोशल मीडियावर आणि इतर मुलाखतींमध्ये ती बेधडकपणे तिची मतं मांडताना दिसते. नुकतीच तापसीने ओटीटी प्ले अवॉर्ड्स 2022 ला (OTT Play Awards) हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर माध्यमांशी बोलताना तापसी पत्रकारांवर वैतागली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. “आधी नीट अभ्यास करून या आणि मग मला प्रश्न विचारा”, असंच ती थेट म्हणाली.

या व्हिडीओमध्ये तापसी पत्रकारांवर चिडताना दिसतेय. “ओरडू नका, पुन्हा हेच लोक बोलतील की अभिनेत्यांना शिष्टाचार नाही”, असं ती म्हणते. यावेळी एक पत्रकार तापसीला तिच्या ‘दोबारा’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारतो. “तुझ्या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर नकारात्मक मोहीम चालवली गेली, यावर तुझं काय म्हणणं आहे”, असा प्रश्न तिला विचारला गेला.

पत्रकाराचा प्रश्न ऐकून तापसी त्यालाच प्रतिप्रश्न करते. “कोणत्या चित्रपटाविरोधात मोहीम चालवली गेली? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला उत्तर दिलात तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. कोणत्या चित्रपटाविरोधात अशी मोहीम चालवली गेली?” पत्रकाराने जेव्हा तिच्या चित्रपटाचं नाव घेतलं तेव्हा ती पुढे म्हणाली, “एकदा थोडा अभ्यास करून प्रश्न विचारा. ओरडू नका, पुन्हा हेच लोक बोलतील की अभिनेत्यांना शिष्टाचार नाही.”

तिच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘योग्य उत्तर दिलंस’ असं एकाने म्हटलं. तर ‘समिक्षण पचवण्याची ताकद नसेल तर चित्रपट बनवू नकोस’, असं दुसऱ्याने लिहिलं. ‘ही नेहमीच इतक्या रागात का असते’, असाही सवाल एका नेटकऱ्याने केला.

याआधीही तापसी पापाराझींवर भडकताना दिसली होती. “तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात? यात माझी काय चूक आहे? मला ज्या वेळेत बोलावलं गेलं, मी त्या वेळेत पोहोचली आहे. तुम्ही माझ्याशी नीट बोललात, तर मी तुमच्याशी नीट बोलेन. कॅमेरा माझ्यावर आहे ना, म्हणून तुम्हाला असं दिसतंय. हाच कॅमेरा जर तुमच्यावर असता तर तुम्ही कसे वागलात ते दिसलं असतं”, अशा शब्दांत ती एका कार्यक्रमात पापाराझींशी बोलताना दिसली होती.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI