Taapsee Pannu: “माझ्याशी नीट वागा..”; तापसी पन्नू पापाराझींवर भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2022 | 3:54 PM

या व्हिडीओमध्ये पापाराझी (paparazzi) आणि तापसीमध्ये बाचाबाची होत असल्याचं पहायला मिळत आहे. तापसी पन्नू ही तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याठिकाणी पोहोचली होती.

Taapsee Pannu: माझ्याशी नीट वागा..; तापसी पन्नू पापाराझींवर भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Taapsee Pannu
Image Credit source: Instagram

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या ‘दोबारा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच तापसीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’विषयी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी (paparazzi) आणि तापसीमध्ये बाचाबाची होत असल्याचं पहायला मिळत आहे. तापसी पन्नू ही तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याठिकाणी पोहोचली होती. मात्र ती येण्यापूर्वी तिथे मीडिया आणि पापाराझी बराच वेळ तिची वाट पाहत होते. पापाराझींनी तापसीला येताच फोटोसाठी थांबण्याची विनंती केली. मात्र तापसी न थांबता पुढे जाते. मग अचानक ती कॅमेरामनचा (Cameraman) आवाज ऐकून थांबते आणि त्याच्यावर रागावते.

काय म्हणाली तापसी?

“तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात? यात माझी काय चूक आहे? मला ज्या वेळेत बोलावलं गेलं, मी त्या वेळेत पोहोचली आहे. तुम्ही माझ्याशी नीट बोललात, तर मी तुमच्याशी नीट बोलेन. कॅमेरा माझ्यावर आहे ना, म्हणून तुम्हाला असं दिसतंय. हाच कॅमेरा जर तुमच्यावर असता तर तुम्ही कसे वागलात ते दिसलं असतं”, अशा शब्दांत तापसी पापाराझीशी बोलत असते. इतक्यात दुसरा फोटोग्राफर तिला म्हणतो, “आम्ही तुझ्याशी आदरानेच वागतोय.” यावर तापसी त्याला म्हणते “तुम्ही नाही, पण हे दुसरे फोटोग्राफर माझ्यावर भडकले होते. मी तुम्हाला इथे ताटकळत ठेवलं नव्हतं.” अखेर वाद तिथेच मिटवत तापसी पुढे म्हणते “नेहमी तुम्हीच खरे असतात आणि कलाकार चुकीचे.”

पहा व्हिडीओ

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

तापसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. तापसीचा ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI