Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..

कंगना रानौत आणि तापसी पन्नू यांच्यातील वाद फार चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात ती चांगलीच भडकलेली दिसली. कंगनाचं नाव काढताच ती संतापली आणि प्रश्न विचारणाऱ्याला झापलं.

Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..
Tapsee Pannu - Kangana Ranaut row
| Updated on: Aug 25, 2026 | 6:53 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि तापसी पन्नू (Tapsee pannu) या दोघींमधील वैमनस्य जगाजाहीर आहे. गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्यातील वाद सुरू असून आता याच मुद्यावरूनत तापसी चांगलीच भडकलेली दिसली. त्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी मात्र तापसीने मागे न हटता चोख प्रत्युत्तर दिलं. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कंगनाचं नाव काढून प्रश्न विचारणाऱ्यांना तिने चांगलंच फटकारलं. तुम्ही लोकं हा मुद्दा संपू का देत नाहीस, असा थेट सवालच तिने विचारला.

खरं तर, तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र या प्रमोशननदरम्यानच माध्यमांशी संवाद साधताना एका व्यक्तीने तिला कंगना रनौतशी संबंधित वादावर प्रश्न विचारला. त्यावर तापसीचा पारा चढला आणि तिने रिपोर्टरला लगेचच चोख प्रत्युत्तर दिलं.

हा मुद्दा उकरून काढण्यात तुम्हाला मजा येते

सोशल मीडियावर चापसीचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या ‘गांधारी’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. याचदरम्यान एकाने तिला कंगना रानौतशी संबंधित प्रश्न विचारला, त्यावर तापसी म्हणाली, ‘ तुम्ही सगळे हा विषय संपू का देत नाही ? आम्हा दोघींनाही तुम्ही असे प्रश्न विचापणं बंद केलं तर हा मुद्दा आपोआप संपेल. तुम्हा सगळ्यांना हे पाहण्यात मजा येतेय, म्हणूनच तुम्ही पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारता. तुम्ही जर असे प्रश्न विचारणं बंद केलं असतं तर हा विषय केव्हाच संपला असता’ अशा शब्दांत तिने त्या रिपोर्टरला सुनावलं.

भडकली तापसी पन्नू

भडकलेल्या तापसीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कंगना आणि तिच्यामधील जुना वाद लोकच वारंवार चर्चेत आणतात. कारण लोक हा विषय संपवूच देत नाहीत, असं ती यातून सांगताना दिसली.

 

Follow Us