Chandra Grahan 2026 : वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण कधी ? ग्रहणाच्या दिवशी ही काम टाळाच,नाहीतर..
2026 या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण हे लवकरच दिसणार आहे. धार्मिक मान्यतांमध्ये ग्रहणाची वेळ खूप खास मानली जाते. अशा वेळेत काही कामं करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Chandra Grahan Rules: 2026 या वर्षातलं दुसरं आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट, शुक्रवार रोजी होणार आहे. खगोलीय दृष्टिकोनातून तसेच ज्योतिषशास्त्रातही चंद्रग्रहणाची ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात या विश्वामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या ग्रह-नक्षत्रांवर आणि जीवनावर होतो. त्यामुळे ग्रहणाच्या काळात केलेल्या थोड्याशाही निष्काळजीपणामुळे दोष किंवा अशुभ फळ मिळू शकते, असं मानलं जातं. खगोलीय गणनेनुसार हे आंशिक चंद्रग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार या ग्रहणाची आंशिक अवस्था सकाळी सुमारे 8 वाजून 4 मिनिटांनी सुरू होऊन 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. मात्र, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतात त्याचा सूतककाळ मान्य केला जाणार नाही.
चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही करून नका ही कामं
पूजेशी संबंधित कामं करू नयेत
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची आणि नियमित पूजा-पाठ न करण्याची परंपरा आहे. या काळात नवीन पूजा किंवा कोणताही मोठा धार्मिक विधी सुरू करण्यापासूनही दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
शुभ काम करणं टाळा
जेव्हा ग्रहण असतं तेव्हा कोणतंही शुभ काम करू नये किंवा त्याची सुरूवात करू नये असा सल्ला दिला जातो. या काळात शुभ कार्य करण्याऐवजी ध्यान, मंत्रजप आणि ईश्वराचे नामस्मरण करणं अधिक चांगलं मानलं जातं. जर एखादं शुभ काम करायचं असेल तर ते ग्रहणाच्या कालावदीनंतर करावं असंही सांगितलं जातं.
आहाराबाबत काळजी घ्या
धार्मिक परंपरेमध्ये ग्रहणाच्या काळात अन्न सेवन करण्याबाबतही अनेक नियम सांगितले आहेत. मान्यतेनुसार, ग्रहण सुरू होण्यापूर्वी जेवण करून घ्यावं आणि ग्रहणाच्या काळात काहीही खाणं-पिणं टाळावं. मात्र, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याच्या गरजेनुसार अन्न आणि औषधे घ्यावीत.
नकारात्मक विचार दूर ठेवा
चंद्र ग्रहणाच्या काळात मन सांत ठेवा, असा सल्ला दिला जातो. या कालावधीमध्ये कोणाशीही वाद घालणं, रागावणं किंवा त्रास, ताण वाढेल अशी परिस्थिती टाळावी, ते चांगलं मानलं जात नाही.
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही ग्रहणाचा संबंध ग्रह-नक्षत्रांमध्ये होणाऱ्या बदलांशी जोडला जातो. याच कारणामुळे ग्रहणाच्या काळात काही नियमांचे पालन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
