मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात द नाईन्स नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. हे एक बार आणि रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय मंकणी, प्रतिनिधी: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात द नाईन्स नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. हे एक बार आणि रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामुळे रूपाली चाकणकर यांच्या नव्या व्यवसायाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पुण्यात ‘द नाईन्स’ हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रुपाली चाकणकरांना द्यावा लागला होता राजीनामा
गेल्या काही काळापासून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर या वादात सापडलेल्या आहेत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नाव आल्यामुळे चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच वारंवार होणाऱ्या टीकेनंतर त्यांना राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडावे लागले होते. या सर्व वादानंतर चाकरणकर यांनी आता व्यवसायात एन्ट्री केली आहे. त्यांच्या हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जयंत पाटील यांची उपस्थिती असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात 19 जणांवर गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे.
