AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut: कंगना यांनी ‘बी-ग्रेड’ म्हटलं, आता तापसी पन्नूने सोडलं मौन; दिलं सडेतोड उत्तर

Kangana Ranaut: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्यासोबतच्या वादाबद्दल तापसी पन्नू नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. 2019 पासून या दोघींमध्ये वाद असल्याचं म्हटलं जातं.

Kangana Ranaut: कंगना यांनी 'बी-ग्रेड' म्हटलं, आता तापसी पन्नूने सोडलं मौन; दिलं सडेतोड उत्तर
Kangana Ranaut and Taapsee PannuImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 23, 2026 | 7:22 AM
Share

अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना राणौत यांच्यातील वादाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. दोघींनीही या प्रकरणावर वेगवेगळ्या वेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बऱ्याच वर्षांनंतर तापसीने पुन्हा एकदा या जुन्या वादावर भाष्य केलं आहे. तापसीने या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचं स्पष्ट केलं. तापसी नुकतीच ‘इंडिया टुडे वुमन समिट 2026’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला अभिनेत्री आणि खासदार कंगना यांच्यासोबतचे संबंध आता सुधारले आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आलं. यावर तापसीने मिश्कील अंदाजात उत्तर दिलं.

काय म्हणाली तापसी?

तापसीच्या म्हणण्यानुसार, या कथित वादाची चर्चा सुरू होण्यापूर्वीही ती कंगना यांना भेटली नव्हती आणि वादानंतरही दोघींची प्रत्यक्ष भेट झाली नाही. “आता तर खूप जणी आहेत, तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? मी त्यांना भेटलेले नाही. जेव्हा हा कथित वाद सुरू झाला, तेव्हाही मी त्यांना भेटले नव्हते. मी त्यांना आताही भेटलेले नाही. त्यांच्याबद्दलचं माझं मत हे माझ्या संगोपनातून, माझ्या बोलण्याच्या पद्धतीतून, गोष्टींकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनातून आणि त्यांच्या दृष्टीकोनातून दिसून येतं. त्या त्यांच्या दृष्टीकोनावर ठामर आहेत. त्यामुळे प्रत्येकाची भूमिका काय आहे, हे प्रत्येकाने पाहून ठरवणं पुरेसं आहे, असं मला वाटतं”, असं तापसीने स्पष्ट केलं.

कुठून सुरू झाला होता वाद?

तापसी आणि कंगना यांच्यातील वादाची सुरुवात 2019 मध्ये झाल्याचं म्हटलं जातं. तापसीने कंगना यांच्या ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं होतं, मात्र त्यावेळी तिने मुख्य भूमिका साकारलेल्या कंगना यांचंच नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे कंगना यांची बहीण रंगोली चंडेलने तापसीवर निशाणा साधत तिला ‘सस्ती कॉपी’ असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर दोघींच्या वादाची चर्चा सुरू झाली. 2020 मध्ये बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि आऊटसायडर्स या मुद्द्यावर चर्चा पेटल्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं. त्यावेळी कंगना यांनी तापसीसह काही अभिनेत्रींबाबत कठोर शब्दांचा वापर केला होता. तर दुसरीकडे तापसीने कंगना यांच्याविरोधात वैयक्तिक टीका केली नसल्याचं अनेकदा सांगितलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ