TMKOC | ‘आमच्यात वाद? भांडण? छे…!’, ‘जेठालाल’शी ऑफस्क्रीन वादावर ‘तारक मेहता’ म्हणतात…  

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘तारक मेहता’ची भूमिका करणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) आणि ‘जेठलाल’ साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्यामध्ये काही दिवसापासून वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

TMKOC | ‘आमच्यात वाद? भांडण? छे...!’, ‘जेठालाल’शी ऑफस्क्रीन वादावर ‘तारक मेहता’ म्हणतात...  
तारक मेहता का उल्टा चष्मा

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘तारक मेहता’ची भूमिका करणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) आणि ‘जेठलाल’ साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्यामध्ये काही दिवसापासून वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या वादामुळे दोन्ही कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांशी बोलत नाहीत, असेही म्हटले जात होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातम्यांवर आता शोच्या ‘तारक मेहता’ अर्थात अभिनेता शैलेश लोढा यांनी आपली प्रतिक्रिया देत या वृत्ताला पूर्णपणे फेटाळून लावले आहे (Taarak Mehta aka Actor Shailesh Lodha reacted on clashes with dilip joshi).

शैलेश लोढा यांनी एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. त्यांचे सहकलाकार दिलीप जोशी यांच्याबरोबर ऑफ स्क्रीन संबंधही तितकेच दृढ आहेत, जितके त्यांचे ऑन-स्क्रीन संबंध दाखवले आहेत. दिलीप जोशी आणि त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. एवढेच नव्हे तर, त्यांनी असेही म्हटले आहे की, अशा बातम्या ऐकल्यामुळे मला खूप हसू येत आणि असं वाटतं की या खोट्या बातम्या कोण पसरवत असेल?

आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत!

शैलेश लोढा पुढे म्हणतात की, आम्हा दोघांना शोमध्ये ज्या प्रकारे पाहिले जाते, वास्तविक जीवनातीही आमचे नात्याचे संबंध त्यापेक्षा खूपच दृढ आहेत. ते म्हणतात की, आम्ही बहुतेक शूट एकत्रच करतो आणि शूटिंग नंतरही आम्ही बर्‍याच वेळेस एकमेकांशी बोलत राहतो. सेटवरील लोक आम्हाला ‘बेस्ट बडी’ म्हणतात. एवढेच नाही तर, आम्ही दोघेही समान-मेकअप रूम देखील शेअर करतो. आता आणखी काय पुरावा हवा? शैलेश लोढा यांनी दिलीप जोशी यांचे कौतुक केले आणि म्हटले की, मी त्यांचा खूप आदर करतो (Taarak Mehta aka Actor Shailesh Lodha reacted on clashes with dilip joshi).

काय होती ‘ती’ बातमी?

गेल्या आठवड्यात एका मीडिया पोर्टलने आपल्या एका बातमीत लिहिले होते की, ‘दिलीप जोशी आणि शैलेश लोढा एकमेकांशी बोलत देखील नाहीत. ते येऊन त्यांचे सीन एकत्र शूट करतात आणि त्यानंतर हे दोघेही आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात. या दोघांमध्ये यापूर्वी काही मोठे वाद घडले आहेत, ज्यामुळे आता दोघांनाही एकमेकांशी बोलायला आवडत नाही. पण, शैलेश लोढा आणि दिलीप जोशी खूप व्यावसायिक आहेत. वैयक्तिक वाद बाजूला ठेवून ते दोघे चित्रीकरण करतात.

हे वृत्त म्हणजे निव्वळ अफवा!

मात्र, आता खुद्द अभिनेते शैलेश लोढा यांनी हे वृत्त फेटाळून लावत, ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. सेटवर तर आम्ही दोघे एकत्र असतोच, पण वास्तविक जीवनातही आमची मैत्री खूप दृढ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

(Taarak Mehta aka Actor Shailesh Lodha reacted on clashes with dilip joshi)

हेही वाचा :

Funny Video | बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा भन्नाट व्हिडीओ

Rashmika Mandanna | बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI