AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’च्या माधवी भाभीची मुलगी तिच्यापेक्षाही सुंदर; बॉलिवूड अभिनेत्रींशी होतेय तुलना

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत माधवी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशीची रिअल लाइफ मुलगी खूपच सुंदर आहे. सोनालिकाने मुलीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्रींशी केली जातेय.

'तारक मेहता..'च्या माधवी भाभीची मुलगी तिच्यापेक्षाही सुंदर; बॉलिवूड अभिनेत्रींशी होतेय तुलना
अभिनेत्री सोनालिका जोशी आणि तिची मुलगी आर्या जोशीImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2025 | 9:56 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. यातील प्रत्येक कलाकार लोकप्रिय असून गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मालिकेतील हे कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत, त्यांचं कुटुंब कसं आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्यामुळे या कलाकारांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. ‘तारक मेहता..’मध्ये भिडे मास्तरांची पत्नी माधवी भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे सोनालिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले मुलीचे व्हिडीओ. ज्याप्रमाणे मालिकेत माधवी भाभीची ‘सोनू’ ही मुलगी आहे. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही सोनालिकाची एक मुलगी असून तिचं नाव आर्या जोशी आहे.

आर्याचे काही व्हिडीओ सोनालिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून त्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आर्याचं सौंदर्य पाहून तीसुद्धा भविष्यात अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवू शकते, असंही काही नेटकरी म्हणत आहेत. सोनालिकाची मुलगी आर्याला फार कोणी ओळखत नाही. ती लहान असताना अनेकदा सोनालिकाच्या मुलाखतींमध्ये झळकायची. परंतु आता आर्या बरीच मोठी आणि सुंदर झाली आहे. आर्याचं सौंदर्य हे बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं असल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत. आर्यासुद्धा तिच्या आईप्रमाणेच अत्यंत प्रतिभावान आहे.

आर्या जोशी सध्या ग्लॅमर विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय ठरतेय. तिला नृत्याची आणि गायनाची प्रचंड आवड आहे. सोनालिकाने आर्याच्या डान्सचे आणि गायनाचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका व्हिडीओमध्ये सोनालिक आणि आर्या दोघी एकत्र गाणं गाताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये मायलेकीची प्रतिभा पाहून नेटकरीसुद्धा भारावले आहेत.

आर्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये आर्या खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. तिची तुलना दीपिका पादुकोण, आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्रींशी नेटकरी करत आहेत. आर्याचा मॉडर्न अंदाज आणि त्याचसोबत साधेपणा हे कॉम्बिनेशन नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. तिची शैली तिच्या आईपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आर्या सध्या तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून तिला लाइमलाइटपासून दूर राहायचं आहे. इन्स्टाग्रामवरील आर्याचं प्रोफाइल हे प्रायव्हेट असून तिचे फक्त 344 फॉलोअर्स आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!