AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नट्टू काकांच्या बायपास सर्जरीमुळे ‘बाघा’ला मिळाली संधी; ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी सांगितला किस्सा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाची निवड कशा पद्धतीने झाली, याविषयीचा खुलासा निर्माते असित कुमार मोदी यांनी केला आहे. या मालिकेला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत.

नट्टू काकांच्या बायपास सर्जरीमुळे 'बाघा'ला मिळाली संधी; 'तारक मेहता..'च्या निर्मात्यांनी सांगितला किस्सा
Tanmay VekariaImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 1:36 PM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 28 जुलै 2026 रोजी ‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त निर्मात्यांनी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. गेल्या अठरा वर्षांत या मालिकेतून काही कलाकार बाहेर पडले, तर काही नवीन कलाकार त्याच्याशी जोडले गेले. मात्र लोकप्रियतेवर याचा अजिबात परिणाम झाला आहे. जेठालाल, बापूजी, बबिताजी, अय्यर, सोढी, भिडे मास्तर, माधवी भिडे, बाघा, दयाबेन, नट्टू काका यांसारख्या सर्व भूमिका घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत. मालिकेच्या पार्टीत निर्माते असितकुमार मोदी यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. यावेळी त्यांनी बाघाच्या निवडीचा मजेशीर किस्सा सांगितला.

“या मालिकेच्या यशाचं श्रेय कोणत्याही एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण टीमचं आहे. कधी तुम्ही विचार केला का, की अशा पद्धतीने वाकडं उभं राहून तुम्ही काम करू शकता? तेसुद्धा बारा तासांपर्यंत. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हे सर्व कलाकार खूप मेहनत करतात. मी त्यांचं महत्त्व जाणतो. ही लोकं या मालिकेसाठी त्यांचं सर्वस्व झोकून देतात”, अशा शब्दांत त्यांनी टीमचं कौतुक केलं.

पहा व्हिडीओ-

यावेळी बाघाच्या भूमिकेबद्दल ते पुढे म्हणाले, “जेव्हा नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम यांचा बायपास झाला, तेव्हा आम्ही बाघाच्या भूमिकेचा विचार केला होता. कारण नट्टू काकाशिवाय जेठालाल एकटाच दुकानात कसा बसणार? त्याचवेळी आम्ही मालिकेत बाघाची एण्ट्री केली आणि त्याने जेठालालसोबत मिळून जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्याने इतकं दमदार काम केलं की, सर्वत्र बाघाचं कौतुक होऊ लागलं. त्याच्या लोकप्रियतेमुळे नट्टू काकांना चिंता वाटली होती की, त्यांना पुन्हा मालिकेत घेतलं जाणार की नाही? परंतु मी त्यांनाही मालिकेत परत बोलावलं होतं.”

या मालिकेबद्दल सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “दयाबेन कधी परत येणार?” मालिकेत सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीला याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो हसत म्हणाला, “मलाही माहीत नाही.” दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी ही मालिका सोडली होती. तेव्हापासून ती मालिकेत परतलीच नाही.

Follow Us
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!