AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती 100% दयाबेनच.. जेनिफर मिस्त्रीचा खुलासा

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं.

3 वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती 100% दयाबेनच.. जेनिफर मिस्त्रीचा खुलासा
Disha VakaniImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2024 | 4:23 PM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सर्वांत लोकप्रिया भूमिका म्हणजे दयाबेन. मात्र हीच भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेतून गायब आहे. अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती. मात्र बाळंतपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि परतलीच नाही. दिशाला मालिकेत पुन्हा आणण्याचे अनेक प्रयत्न निर्मात्यांकडून झाले. मात्र तिने कुटुंबीयांना प्राधान्य देत मालिकेत परतण्यास नकार दिला. एकीकडे मालिकेत दयाबेनच्या कमबॅकची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असताना दुसरीकडे अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दयाबेनच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा करताना दिसतेय.

‘तारक मेहता..’चे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी गेल्या तीन वर्षांपासून एका मुलीचं ऑडिशन घेत असल्याचं जेनिफरने सांगितलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ती म्हणते, “ती 100 टक्के दया आहे. एका बिचाऱ्या मुलीचा ते तीन वर्षांपासून ऑडिशन घेत आहेत. दिल्लीवरून तिला इथे बोलवतात. एक गोष्ट म्हणजे ती मुलगी तरुण आहे. ती 28-29 वर्षांची आहे. त्यामुळे वयातील फरक लगेच दिसून येईल. म्हणून तिची निवड होऊ शकत नाहीये. पण ती हुबेहूब दयासारखीच आहे. आमची तिच्यासोबत मॉक टेस्ट झाली होती. दिलीपजी आणि टप्पू सेना यांचंही वेगवेगळं मॉक शूट झालंय. त्या मुलीचा चेहरा वेगळा आहे, पण तयारी केल्यावर तुम्ही डोळे बंद कराल तेव्हा तुम्ही फरकच सांगू शकणार नाही.”

I know it’s far beyond saving….but le ayo yar byu/i-hades inTMKOC

या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं की ते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत. मालिकेत दयाबेनच्या एण्ट्रीबाबतचा सीन अनेकदा दाखवण्यात आला, मात्र कधीच अभिनेत्रीची एण्ट्री झाली नाही. त्यामुळे अनेकदा प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानी घराघरात लोकप्रिय आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र ती पुन्हा सेटवर परतलीच नाही. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case :प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान