AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC: ‘तारक मेहता..’ सोडल्यानंतर गोलीची अशी अवस्था; लोकांच्या घरी जावून बनवतोय जेवण

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गेल्या 16 वर्षे काम केल्यानंतर कुश शाहने ही मालिका सोडली होती. मालिका सोडल्यानंतर त्याने देशही सोडल्याची चर्चा होती. आता कुशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

TMKOC: 'तारक मेहता..' सोडल्यानंतर गोलीची अशी अवस्था; लोकांच्या घरी जावून बनवतोय जेवण
Kush ShahImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2026 | 3:35 PM
Share

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत गोलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुश शाह सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. मालिकेला निरोप दिल्यानंतर कुशने आता अभिनयापेक्षा वेगळ्या क्षेत्रात एक नवी सुरुवात केली आहे. त्याने स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं असून, पहिल्याच व्हिडीओमध्ये त्याने चक्क अनोखा प्रयोग केला आहे. कुश रस्त्यावर फिरत अनोळखी लोकांना त्यांच्या घरी जाऊन जेवण बनवण्याची परवानगी मागताना दिसत आहे. कुश शाहला लहानपणापासूनच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये पाहणाऱ्या चाहत्यांसाठी त्याचा हा नवा अवतार विशेष आहे. मालिकेत गोलीला खाण्याची प्रचंड आवड असल्याचं दाखवलं जायचं. आता त्याच खाण्याच्या प्रेमाचा वापर कुशने त्याच्या नव्या यूट्यूब कंटेंटमध्ये केला आहे.

पहिल्या व्हिडीओमध्ये कुश मुंबईच्या रस्त्यांवर फिरतो आणि काही लोकांना त्यांच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याची परवानगी मागतो. अनेक जण त्याला नकार देतात. काहींना कॅमेऱ्यासमोर येण्याची भीती वाटते, तर काहींच्या घरातील किचन लहान असल्यामुळे ते तयार होत नाहीत. अखेर एका व्यक्तीने कुशला आपल्या घरी येण्याची परवानगी दिली.

यानंतर कुशने बाजारातून आवश्यक सामान खरेदी केलं आणि त्या कुटुंबासाठी पाइनॅपल करी आणि राइस ही खास डिश तयार केली. कुशला स्वयंपाक करताना पाहून घरातील लोकही आनंदी झाले. जेवण तयार झाल्यानंतर त्याने सर्वांना ते वाढलं आणि त्याच्या हातच्या पदार्थाला चांगला प्रतिसाद मिळाला. युट्यूबवर पदार्पण करताना कुशने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं की, यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा विचार तो बऱ्याच काळापासून करत होता. अनेकदा विचार, प्लॅनिंग आणि नंतर निर्णय पुढे ढकलण्याचं काम सुरू होतं. अखेर पाच वर्षांनंतर त्याने हा निर्णय प्रत्यक्षात आणला.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Kush Shah (@iamkushshah_)

कुशने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचा उल्लेख करत, आता ते प्रेम परत करण्याची वेळ असल्याचं म्हटलं. त्याला स्वयंपाकाची खूप आवड असल्यामुळे या आवडीला त्याने आपल्या नव्या कंटेंटशी जोडल्याचं दिसत आहे. कुश शाहने तब्बल 16 वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये काम केलं. 2024 मध्ये त्याने मालिकेला निरोप दिला. पुढील शिक्षणासाठी तो न्यूयॉर्कला गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

कुशच्या या नव्या युट्यूब व्हिडीओवर ‘तारक मेहता’मधील त्याचे सहकलाकारही प्रतिक्रिया देताना दिसले. झील मेहता हिने “माझ्या घरी कधी येतोयस?” अशी कमेंट केली, तर पलक सिंधवानीनेही आनंद व्यक्त केला. त्यामुळे कुशच्या नव्या प्रवासाला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...