TMKOC: मालिकेत कंजूस दिसणार ‘पोपटलाल’ कोट्यवधी संपत्तीचा मालक; एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन…

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम ‘पोपटलाल’ खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड श्रीमंत; एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन... मालिकेत अविवाहित असलेल्या अभिनेता आहे तीन मुलांचा वडील

TMKOC: मालिकेत कंजूस दिसणार ‘पोपटलाल’ कोट्यवधी संपत्तीचा मालक; एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन...
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 4:54 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका गेल्या १४ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या फार जवळची आहे. गोकूळ धाम सिनेमातील एकी आणि टप्पू सेना यांची मस्ती अशा अनेक आनंददायी गोष्टीमुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. गेल्या काही दिवसांत मालिकेने अनेक चढ-उतार पाहिले, पण कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सोडलं नाही. मालिकेतील तारक मेहता, नट्टू काका, माधवी, अशा प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेतील आणखी एक पात्र म्हणजे ‘पोपटलाल’… ‘दुनिया हिला दुंगा…’ म्हणणारा पोपटलाल मालिकेत अविवाहित असून सोसायटीतील प्रत्येक जण पोपटलालचं लग्न कधी होईल या प्रतीक्षेत आहे.

मालिकेत अविवाहित आणि कंजूस दिसणार ‘पोपटलाल’ खऱ्या आयुष्यात मात्र कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. पोपटलाल म्हणजे अभिनेता श्याम पाठक कायम त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. पण आता पोपटलाल त्याच्या संपत्ती मुळे चर्चेत आला आहे. श्याम पाठक ‘पोपटलाल’ ही भूमिका साकारण्यासाठी तगडं मानधन घेतो. शिवाय अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोपटलाल उर्फ श्याम पाठक याच्याजवळ जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ‘तारत मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका एपिसोडसाठी अभिनेता जवळपास ६० हजार रुपये मानधन घेतो. गेल्या १४ वर्षांपासून अभिनेता मालिकेत काम करत आहे.

हे सुद्धा वाचा

पोपटलाल उर्फ श्याम पाठक फक्त मालिकेच्या माध्यमातून नाही तर, अनेक जाहिराती आणि कार्यक्रमांच्या माध्यामातून देखील पैसे कमावतो. शिवाय त्याच्याकडे महागडी कार असल्याची देखील चर्चा रंगत आहे. श्याम पाठक याने एका चिनी सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेता कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.

मालिकेत लग्न करण्यासाठी मॅरेज ब्यूरोमध्ये सतत जाणारा पोपटलाल उर्फ श्याम पाठक खाऱ्या आयुष्यात सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिनेता वैवाहिक असून तीन मुलांचा वडील आहे. ४६ वर्षीय श्याम याच्या पत्नीचं नाव रश्मी पाठक असं आहे. श्याम पाठक याचं कुटुंब झगमगत्या विश्वापासून दूर आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.