‘तारक मेहता..’मधील शैलेश लोढा यांचं मानधन थकवल्याप्रकरणी अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन

मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांनी त्यांचं मानधन थकवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यावर आता मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे.

'तारक मेहता..'मधील शैलेश लोढा यांचं मानधन थकवल्याप्रकरणी अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन
Shailesh LodhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:59 AM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून आजवर बऱ्याच कलाकारांची एग्झिट झाली. काही दिवसांपूर्वीच अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेचा निरोप घेतला. ते या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारत होते. मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांनी त्यांचं मानधन थकवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यावर आता मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे. ‘तारक मेहता..’च्या सेटवर मीडिया मिटींगदरम्यान असित मोदी यांनी मालिकेशी संबंधित बऱ्याच मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

निर्मात्यांनी फेटाळल्या चर्चा

“आम्ही पैसे दिले नसल्याची जी चर्चा होतेय, त्यात काही तथ्य नाही. मी कोणाच्या मेहनतीचे पैसे माझ्या खिशात ठेवून काय करू? देवाने मला बरंच काही दिलंय, सर्वांत जास्त तर मला प्रेम मिळालं आहे. मी लोकांना पैसे दिले नाही, या चर्चा खोट्या आहेत. मला आनंद आहे की मी लोकांना हसवतो”, असं असित मोदी म्हणाले.

मालिकेतून कलाकारांच्या एग्झिटवर ते पुढे म्हणाले, “हे पहा, 15 वर्षांचा हा प्रवास आहे. 2008 मध्ये आम्ही ही मालिका सुरू केली होती. जास्तीत जास्त कलाकार तेच आहेत, काही लोक बदलले आहेत. मला त्या कारणांमध्ये नाही जायचंय. मी असं म्हणेन मी सर्वांना जोडून ठेवतो. आमच्या शोमध्ये कधीच कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होत नाही. 2008 पासून चहावाला असो, स्पॉटबॉय असो, मेकअपमॅन असो, ड्रेसमॅन असो.. आम्ही सर्वांना एका कुटुंबाप्रमाणे वागवतो.”

हे सुद्धा वाचा

शैलेश लोढा यांची सहा आकडी फी निर्मात्यांनी थकवल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी त्यांनी ही मालिका सोडली. मालिकेत आता त्यांची जागा अभिनेता साहिल श्रॉफने घेतली आहे. शैलेश यांनी मानधन थकवल्याच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र एका मुलाखतीत ते उपरोधिकपणे म्हणाले होते, “यात काही नवीन नाही.”

शैलेश यांनी पूर्ण केली नाही प्रक्रिया

“मालिका सोडल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास अनेकदा सांगूनही शैलेश लोढा यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तुम्ही कोणताही शो किंवा कंपनी सोडता, तेव्हा तुम्हाला ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कोणतीच कंपनी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मानधन देत नाही”, असं मालिकेचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी म्हणाले.

“शैलेश लोढा असो किंवा इतर कोणतेही कलाकार.. ते सर्वजण प्रॉडक्शन हाऊससाठी एका कुटुंबाप्रमाणे आहेत. त्यांनी मालिका सोडल्यानंतर आम्ही आदरपूर्वक मौन बाळगलं होतं. मात्र जेव्हा एखादा कलाकार असा वागतो, तेव्हा खूप वाईट वाटतं. शोमुळे जी लोकप्रियता मिळाली, त्याला विसरणं अनैतिक आहे. पेमेंट हा काही मुद्दा नाही. त्यांनी प्रक्रिया पूर्ण करताच आम्ही त्यांना पूर्ण मानधन देऊ”, अशी प्रतिक्रिया प्रॉडक्शन टीमच्या जवळच्या सूत्रांनी दिली.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.