Tamannah-Vijay : ‘जेलर’ फेम अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात? अखेर नात्याचं सत्य समोर

Tamannah-Vijay : तमन्ना भाटिया - विजय वर्मा यांच्या नात्याचं नक्की काय आहे सत्य? विवाहबंधनात अडकणार का? या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया - विजय वर्मा यांच्या नात्याची चर्चा

Tamannah-Vijay : जेलर फेम अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात? अखेर नात्याचं  सत्य समोर
| Updated on: Sep 01, 2023 | 9:25 AM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवतीला दोघांनी त्यांच्या नात्याचं सत्य गुपित ठेवलं. पण एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने विजय वर्मा यांच्यासोबत असलेल्या नात्याचं सत्य सांगितलं. अशात नुकताच अभिनेत्रीला बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार का? असा प्रश्न विचारला.. या प्रश्नवर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. शिवाय सध्या अभिनेत्री कोणत्या गोष्टीकडे अधीक लक्ष देत आहे… याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे…

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नावर माझा विश्वास आहे. पण सध्या मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं आहे..’ तमन्ना सध्या तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा अधिक खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. विजय आणि तमन्ना यांची जोडी अनेक ठिकाणी एकत्र देखील दिसली.

तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia Movies) स्वतःचं वक्तव्य पूर्ण करत म्हणाली, ‘जेव्हा माझ्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगते तेव्हा माझं पूर्ण लक्ष माझ्या करियरकडे असतं…’ तमन्ना हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीची ‘आखरी सच’ ही वेब सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे.

 

 

अभिनेते रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमात देखील अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. शिवाय ‘ लस्ट स्टोरीज 2’ मध्ये तमन्ना हिने साकारलेल्या भूमिकेची तुफान चर्चा रंगली. सिनेमात अभिनेत्रीने बॉयफ्रेंड विजय वर्मा याच्यासोबत इंटिमेट सीन दिले होते. ज्यामुळे विजय आणि तमन्ना चर्चेत आले होते.

दरम्यान, दोघं मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. भरतात परतल्यानंतर दोघांना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं… सोशल मीडियावर देखील विजय आणि तमन्ना यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, दोघे देखील अनेक ठिकाणी एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसले. पण विजय आणि तमन्ना विवाहबंधनात कधी अडकणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत.

तमन्ना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, विजय वर्मा याच्याआधी अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना डेट केलं आहे. तमन्ना कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.