AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय यांचं चाललंय तरी काय? अजित कुमारची रेस पाहण्यासाठी त्रिशासोबत पोहोचले लंडनमध्ये, व्हिडीओने खळबळ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री विजय हे अभिनेत्री त्रिशासोबत अजित कुमारची रेस पाहण्यासाठी लंडनला गेल्याचे दिसत आहेत. हे पाहून चाहते नाराज झाले आहेत.

विजय यांचं चाललंय तरी काय? अजित कुमारची रेस पाहण्यासाठी त्रिशासोबत पोहोचले लंडनमध्ये, व्हिडीओने खळबळ
Trisha and VijayImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 9:38 AM
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेते-रेसर अजित कुमार यांची यू.के.मधील सिल्वरस्टोन रेसिंग सर्किटवर भेट झाली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात सीएम विजय अजित यांना मिठी मारण्यासाठी त्यांच्याकडे पळत जाताना दिसत आहेत. यू.के.मध्ये मिशेलिन ले मॅन्स कपच्या सिल्वरस्टोन राउंडपूर्वी अजित यांनी स्थळावर विजय यांचे स्वागत केले. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये विजय यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील असल्याचे दिसले. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत तेथे अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील पोहोचली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वात आधी त्रिशा अजित कुमारला वाकून पाहात असते. तेवढ्यात विजय देखील तिच्या शेजारी येतात आणि वाकून पाहतात. कोणी तरी शूट करत आहे हे पाहिल्यावर दोघेही मागे होतात. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे.

विजय यांना भेटले अजित कुमार

प्रेसने अजित यांना विजय रेसमध्ये सहभागी झाल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “मी तमिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा खूप आभारी आहे की त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सिल्वरस्टोनमध्ये आमची भेट घेतली. आम्ही गेल्या ३४ वर्षांपासून चित्रपट उद्योगात एकत्र काम करत आहोत आणि आता ते मुख्यमंत्री झाले आहेत याचा मला खूप आनंद आहे.”

अजित यांनी भविष्यात भारतात क्रीडा स्पर्धा आयोजित होण्याची आशाही व्यक्त केली आणि म्हटले, “ते फक्त मोटारस्पोर्टच नव्हे तर सर्व प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही करत आहेत. ते मोटारस्पोर्टकडेही लक्ष देत आहेत. मला आनंद आहे की त्यांनी भारत, विशेषतः चेन्नईमध्ये ‘ले मॅन्स सिरीज’सारखे इव्हेंट्स आयोजित करण्यासाठी आवश्यक लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधा समजून घेण्यासाठी आमंत्रण स्वीकारले. माझी इच्छा आहे की हे इव्हेंट्स भारतात व्हावेत आणि आपण सर्व भारतात रेस करावी, तुम्हाला माहीत आहे ना?”

अजित कुमार आणि विजय यांच्याबद्दल

अजित यांनी १९९३ च्या ‘अमरावती’ चित्रपटातून लीड अभिनेते म्हणून डेब्यू केले होते. तर विजय यांनी १९९२ च्या ‘नालैया थीरपु’ चित्रपटातून पदार्पण केले होते. तीन दशकांहून अधिक काळ दोघांच्या चाहत्यांनी आपापल्या आवडत्या स्टार्समधील कथित स्पर्धेवरून ऑफलाइन आणि ऑनलाइन भांडणे केली आहेत. त्यांनी एकमेकांचा चिडवण्यासाठी टोपणनावेही ठेवली आहेत. विजयच्या चाहत्यांना ‘अनिल’ (खार) आणि अजितच्या चाहत्यांना ‘आमाई’ (कासव) म्हटले जाते.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद