
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक रडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिच्यासोबत घडत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. आणि या व्हिडीओमागील सत्य सांगत आता तिने थेट याबद्दल नाना पाटेकरांना जबाबदार धरलं आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेलं नव्हतं. पण टिव्ही 9 मराठीशी बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांच स्पष्ट नाव घेऊन अनेक आरोप केले आहेत.
माझ्या कारचा ब्रेक काढून टाकला होता
तिला होत असलेला हा त्रास आणि मानसिक छळ याला नाना पाटेकर जबाबदार असल्याचं तिने म्हटलं आहे. ती म्हणाली “माझ्यासोबत या 4 ते 5 वर्षांपासून फार काही विचित्र घटना घडत आहेत. माझ्या कारचा ब्रेक काढून टाकला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा पाठलाग केला गेला जात आहे . मी जिथेही जायचे तिथे माझा पाठलाग करणारे लोक मला दिसायचे.मी साईन केलेले प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घेण्यात आले. मला हा त्रास देण्यात नाना पाटेकरांचा हात आहे.” असं तिने गंभीर आरोप केला आहे.
माझ्या जेवणात विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न केला गेला
एवढंच नाही तर तिने सुशांतसिंग राजपूतसोबत जे केलं तेच माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही तिने म्हटलं तसेच तनुश्रीने अजून एक गंभीर आरोप केला आहे तो म्हणजे तिच्या जेवणात विष मिसळून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा. ती म्हणाली “माझा पाठलाग करण्यासाठी जी माणसं लावली आहेत त्यात नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील नाना पाटेकरांचे कोणी साथी असतील तर त्यांचाही सहभाग आहे. मला त्याच्यावरच हा संशय आहे. मी ज्या हॉटेलमध्ये राहायचे तिथे विचित्र माणसे माझ्या रुमचे दार वाजवून मला त्रास द्यायचे. अनेकदा माझ्या जेवणात विष मिसळून मला आजारी पाडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मी वाचले.”
मी 17 ते 18 तास बेशुद्ध असल्यासारखं पडायचे
तनुश्रीने तिच्या घरातील मेडबद्दलही धक्कादायक माहिती सांगितली. ती म्हणाली “माझ्या घरात जी मेड होती ती पण त्यांच्याच ग्रुपमधील असेल कारण ती माझ्या जेवणात काहीतरी मिसळायची ज्यामुळे माझी तब्येत अजून खराब होत होती. मी 17 ते 18 तास बेशुद्ध असल्यासारखं पडायचे. माझ्या घरावर देखील त्यांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कब्जा केला होता. मला वेडं ठरवण्यासाठी, मला मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला होता.” असे अनेक धक्कादायक गोष्टी सांगत तिने या सर्वांबद्दल फक्त नाना पाटेकरांनाच जबाबदार धरलं आहे. तेच हे सगळं घडवून आणत असल्याचं तिने म्हटलं आहे.नाना पाटेकर अभिनेते नसते तर अंडरवर्ल्ड डॉन असते असं त्यांनीच म्हटलं होतं त्यामुळे तेच यात सगळ्यात असू शकतात असंही तिने म्हटलं.
दरनम्यान तिने आता पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनी याबाबत सर्व बाजूंनी तपास करून या घटनेचा छडा लावावा अशी मागणीही तिने केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते नवीन वळण लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.