AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहताचा ‘सोढी’ बेपत्ताच, गुरुचरण सिंगच्या वडिलांचा मोठा खुलासा, बेपत्ता होण्याच्या एक दिवस अगोदर..

Gurucharan Singh : तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर अजूनही गुरुचरण सिंग याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाहीये. पोलिस या प्रकरणात तपास करताना देखील दिसत आहेत.

तारक मेहताचा 'सोढी' बेपत्ताच, गुरुचरण सिंगच्या वडिलांचा मोठा खुलासा, बेपत्ता होण्याच्या एक दिवस अगोदर..
Gurucharan Singh
| Updated on: May 06, 2024 | 2:57 PM
Share

तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झालाय. 22 एप्रिल 2024 रोजी अभिनेता बेपत्ता झाला असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. आता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन इतके दिवस झाले आहेत. मात्र, अभिनेत्याबद्दल अजून काहीही माहिती मिळत नाहीये. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. गुरुचरण सिंग हा 22 एप्रिलला आपल्या घरातून मुंबईला जात असल्याचे सांगून बाहेर पडला. मात्र, तो विमानतळापर्यंत पोहचलाच नाही. दिल्लीच्या पालम परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये गुरुचरण सिंग हा कैद झाला. पोलिसांच्या हाती अजून या प्रकरणात काहीच लागले नाहीये.

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत सापडल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय. गुरुचरण सिंगने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. गुरुचरण सिंग हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतं. गुरुचरण सिंगची मोठा चाहता वर्ग आहे.

आता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंग याचे वडील हरगीत सिंग यांनी मोठा खुलासा केलाय. गुरुचरण सिंग हा बेपत्ता होण्याच्या एकदिवस अगोदर घरात कसे वातावरण होते आणि काय घडले, याबद्दलच सांगताना गुरुचरण सिंगचे वडील दिसले आहेत. हरगीत सिंग यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये.

हरगीत सिंग म्हणाले की, काही खास सेलिब्रेशन नव्हते. आम्ही सर्वजण एकत्र असल्याने खूप चांगले वाटले. दुसऱ्या दिवशी तो मुंबईला जाणार होता. जे काही होते ते आमच्यासाठी अत्यंत हैराण करणारे नक्कीच आहे. आम्हाला काहीच कळत नाहीये की, जे काही सुरू आहे त्याला कसे सामोरे जावे. आम्ही सर्वचजण खूप जास्त त्रस्त आहोत.

एकंदरीतच काय तर गुरुचरण सिंग बेपत्ता होण्याच्या आदल्यादिवशी घरात कसे वातावरण होते आणि काय घडले, याबद्दलच सांगताना गुरुचरण सिंगचे वडील दिसले आहेत. याचाच अर्थ की, गुरुचरण सिंग हा घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर सर्वकाही एकदम व्यवस्थित होते. गुरुचरण सिंग याच्यासाठी सतत प्रार्थना केल्या जात आहेत. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता मालिकेतील कलाकारांनाही मोठा धक्का बसलाय.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी