करण कुंद्रा याच्या नात्याबद्दल बोलताना थेट तेजस्वी प्रकाश म्हणाली, ‘माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता’, चाहत्यांना बसला धक्का

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे मुंबईमध्ये अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना देखील दिसतात. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.

करण कुंद्रा याच्या नात्याबद्दल बोलताना थेट तेजस्वी प्रकाश म्हणाली, माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, चाहत्यांना बसला धक्का
| Updated on: Aug 10, 2023 | 3:16 PM

मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅसच्या घरातच झाला. बिग बाॅसच्या घरातूनच यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही बिग बाॅस 15 ची विजेती आहे. बिग बाॅसच्या घरात असतानाच तेजस्वी प्रकाश हिला नागिन मालिकेची आॅफर मिळाली होती.

काही दिवसांपूर्वीच नागिन मालिका बंद झालीये. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे सतत स्पाॅट होताना दिसत आहेत.तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये चक्क करण कुंद्रा हा तेजस्वी प्रकाश हिला आंटी म्हणताना दिसला होता.

यानंतर करण कुंद्रा हा लोकांच्या निशाण्यावर आला. अनेकांनी करण कुंद्रा याला टार्गेट करण्यास सुरूवात केली. नुकताच तेजस्वी प्रकाश हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तेजस्वी प्रकाश मोठे खुलासे करताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश म्हणाली की, माझे हे पहिलेच असे रिलेशन आहे जे सर्वांसमोर आहे आणि त्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे.

मात्र, मला माझे रिलेशन अशाप्रकारे जगजाहिर करायला अजिबात आवडत नाही. पुढे तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मुळात म्हणजे माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नसल्याने मला माझे रिलेशन जगासमोर आणावे लागले. माझ्याकडे जर इतर काही पर्याय उपलब्ध असते तर नक्कीच मी माझे रिलेशन अशाप्रकारे जगजाहिर केले नसते. ते सर्वांपासून लपवून ठेवायलाच मला आवडले असते.

मला माझ्या पर्सनल लाईफबद्दल जास्त काही बोलायला अजिबात आवडत नाही. माझे हे पहिलेच असे रिलेशन आहे, ज्याच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे काही दिवसांपूर्वीच गोव्यामध्ये धमाल करताना दिसले होते. तेजस्वीचा वाढदिवस गोव्यामध्ये साजरा करण्यात आला.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी अनेक गाणे देखील केली आहेत. मुळात म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वीला खरी ओळख ही बिग बाॅसच्या घरातूनच मिळालीये.