उर्फीला टक्कर देण्यासाठी हा कारनामा; तेजस्वी प्रकाशच्या फॅशन सेन्सवर नेटकऱ्यांची टीका

'बिग बॉस' फेम तेजस्वी प्रकाशचा अत्यंत बोल्ड अंदाज मुंबईतल्या नुकत्याच एका कार्यक्रमात पहायला मिळाला. यावेळी तिने हाय स्लीट ड्रेस परिधान केला होता. अगदी कमरेपर्यंत साइड कट असलेल्या या ड्रेसमध्ये तेजस्वीला पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

उर्फीला टक्कर देण्यासाठी हा कारनामा; तेजस्वी प्रकाशच्या फॅशन सेन्सवर नेटकऱ्यांची टीका
Tejasswi PrakashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 4:46 PM

मुंबई : 8 डिसेंबर 2023 | ‘नागिन’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’च्या घरात तिच्या रिलेशनशिपमुळे सर्वाधिक चर्चेत आली. अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची जोडी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. अत्यंत कमी वयात तेजस्वीने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात तिने ज्या प्रकारचा ड्रेस परिधान केला होता, ते पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात तेजस्वीने हजेरी लावली होती. यावेळी तिने बोल्ड ब्लॅक साइड कट ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमात तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

‘तेजस्वीच्या ड्रेसिंग सेन्सला काय झालंय’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘पहिल्यांदा मला तेजस्वीचा ड्रेस अजिबात आवडला नाही,’ असं दुसऱ्याने लिहिलं. ‘हिला तर लाजच नाही. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अश्लीलचा पसरवल्याच्या आरोपात अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे’, अशी संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली. ‘हे सर्वजण उर्फी जावेदला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहेत वाटतं’, अशीही उपरोधिक टीका युजर्सनी केली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

तेजस्वी प्रकाशचे इन्स्टाग्रामवर 70 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील ती सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री असून करण कुंद्रासोबतच्या तिच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं. ‘बिग बॉस 14’मध्ये दोघांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या घरातच दोघं एकमेकांना डेट करू लागले. नुकतीच या दोघांनी ‘टेम्प्टेशन आयलँड इंडिया’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं.

तेजस्वी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नागिन या प्रसिद्ध मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती दोन लाख रूपये मानधन घेत होती. सोशल मीडियाद्वारेही ती चांगली कमाई करते. करण कुंद्रासोबत ती लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. एका मुलाखतीत तेजस्वीने यावर मौन सोडलं होतं. “आम्ही एकमेकांवर अजिबात दबाव टाकत नाही. मला माझ्या आणि करणच्या लग्नाबद्दल सातत्याने विचारलं जातं. करणला माहित आहे की, मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये एका चांगल्या ठिकाणी आहे. तो मला लग्नाबद्दल तेव्हाच बोलेल ज्यावेळी मी त्याच्यासाठी तयार असेन”, असं उत्तर तिने दिलं होतं.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...