Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील एक दिवस; ‘अनिरुद्ध’ला का आवडतं काल्पनिक विश्व?

| Updated on: Apr 17, 2022 | 12:16 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आणि त्यातील व्यक्तीरेखा घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2019 मध्ये ही मालिका सुरू झाली आणि तेव्हापासून टीआरपीच्या यादीत ही मालिका अग्रस्थानी आहे.

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करतेच्या सेटवरील एक दिवस; अनिरुद्धला का आवडतं काल्पनिक विश्व?
Aai Kuthe Kay Karte set
Image Credit source: Instagram
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आणि त्यातील व्यक्तीरेखा घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2019 मध्ये ही मालिका सुरू झाली आणि तेव्हापासून टीआरपीच्या यादीत ही मालिका अग्रस्थानी आहे. मालिकेत अनिरुद्धची (Aniruddha) भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर मालिकेविषयी विविध पोस्ट लिहित असतात. नुकताच त्यांनी सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पहाटेपासून ते रात्री पॅकअपपर्यंतची सेटवरील दृश्ये या व्हिडीओत पहायला मिळत आहेत. आई कुठे काय करतेच्या या पडद्यामागील दृश्यांमध्ये संजना, अरुंधती, यश या सर्व व्यक्तीरेखा पहायला मिळत आहेत. या व्हिडीओसोबतच मिलिंद यांनी मालिकेसाठी एक पोस्ट लिहिली आहे. सेटवरील हे काल्पनिक विश्व त्यांना खूप आवडत असल्याचं त्यांनी त्यात म्हटलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

पहाटेपासून रात्री पॅकअपपर्यंत.. ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील दिवस. 2019 पासून आई कुठे काय करतेचं सेट, कॅमेरामन राजू देसाई आणि त्यांची लाइटमनची टीम झलक. हे सर्वकाही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे आणि ही सर्व दृश्ये पडद्यामागील आहेत. आई कुठे काय करतेचं हे सुंदर विश्व आहे. दिग्दर्शक, कॅमेरा, प्रॉडक्शन, मेकअप, वेशभूषा, कलाकार, स्पॉट बॉईज या सर्वांमधील सहकार्य अप्रतिम आहे. मला लहानपणापासूनच शूटिंग पहायला खूप आवडतं. हे काल्पनिक विश्व आणि स्वप्नांचं जग मला खूप आवडतं.

जरी या मालिकेची कथा काल्पनिक असली तरी त्यातील सर्व पात्रं ही घराघरात लोकप्रिय झाली आहेत. लोकांना ही पात्रं खरीखुरी वाटतात. नोव्हेंबर 2019 मध्ये या पात्रांचा जन्म झाला आणि आता ते लार्जर दॅन लाइफ झाले आहेत. अरुंधती, संजना, अप्पा, कांचन, आई, यश, अनघा, विमल, अभिषेक, ईशा, आशुतोष, सुलेखाताई, अविनाश, नितीन शाह, शेखर, विशाखा, गौरी, विद्याताई आणि मी अनिरुद्ध देशमुख. ही नावं 2019 पूर्वी कधीही ऐकली नव्हती. पण आता अनिरुद्ध किंवा अन्या ही नावं माझ्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत आणि मला खात्री आहे की ते दीर्घकाळ टिकून राहतील.

या मालिकेने काही दिवसांपूर्वीच 600 भागांचा टप्पा पार केला. खिळवून ठेवणारं कथानक, दमदार संवाद, रंजक ट्विस्ट आणि कलाकारांचं अभिनय यांमुळे या मालिकेला प्रचंड यश मिळालं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

हेही वाचा:

Sanjay Dutt: “पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो”; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव

Hruta Durgule: हृता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी बांधणार प्रतीक शाहशी लग्नगाठ