AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Majhi Kalubai | प्राजक्ता-वीणानंतर पुन्हा एकदा बदलणार ‘आई माझी काळूबाई’ची नायिका! ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘आर्या’

आता पुन्हा एकदा या मालिकेत मोठा बदल होत आहे. मालिकेत पुन्हा एकदा आर्या बदलणार आहे. आर्याच्या भूमिकेत आता नवा चेहरा समोर येणार आहे. हा चेहरा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे.

Aai Majhi Kalubai | प्राजक्ता-वीणानंतर पुन्हा एकदा बदलणार ‘आई माझी काळूबाई’ची नायिका! ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘आर्या’
आई माझी काळूबाई
| Updated on: Mar 30, 2021 | 5:37 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरची ‘आई माझी काळुबाई’ (Aai Majhi Kalubai) ही मालिका सुरु झाल्यापासूनच काहीना काही कारणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेसंदर्भातील विविध वाद आणि चर्चा अजूनही सुरूच आहे. मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) या मालिकेत मुख्य नायिका अर्थात ‘आर्या’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, प्राजक्ताची वागणुक व्यवस्थित नसल्याचे सांगत निर्मात्या अलका कुबल यांच्या निर्णयानुसार तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले. यानंतर प्राजक्ताच्या जागी ‘मराठी बिग बॉस’ फेम वीणा जगताप (Veena Jagtap) हिची वर्णी लागली होती. मात्र, आता वीणाने देखील या मालिकेला गुडबाय म्हटले आहे (Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat replaces Veena Jagtap for Lead Character).

आता वीणाच्या जागी दुसऱ्या एका अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे. ‘फ्रेशर्स’ फेम अभिनेत्री रश्मी अनपट-खेडेकर (Rashmi Anpat) मालिकेत ‘आर्या’ची भूमिका साकारणार आहे.

मालिकेतून प्राजक्ताला दाखवलेला बाहेरचा रस्ता

मालिकेच्या सुरुवातीला ‘आर्या’ हे पात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘हे’ पात्र साकारले होते. त्यानंतर या मालिकेतून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर या मालिकेतून स्वत:च बाहेर पडल्याचं प्राजक्ता म्हटली होती. त्यानंतर या सगळ्यात खूप मोठा वाद उभा राहिला होता. सोशल मीडियावरही हा वाद चर्चेत आला होता. त्यानंतर अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसली आणि तिने प्राजक्ताला रिप्लेस केले होते (Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat replaces Veena Jagtap for Lead Character).

पुन्हा एकदा नायिका बदलणार!

मात्र, आता पुन्हा एकदा या मालिकेत मोठा बदल होत आहे. मालिकेत पुन्हा एकदा आर्या बदलणार आहे. आर्याच्या भूमिकेत आता नवा चेहरा समोर येणार आहे. हा चेहरा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘फ्रेशर्स’, ‘अग्निहोत्र 2’ या सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री रश्मी अनपट आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

… म्हणून वीणाने सोडली मालिका!

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शुटिंग शेड्युलमुळे वीणा सतत आजारी पडत होती. त्यामुळे वीणाने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे या मालिकेमुळे शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याचे त्यांचे चाहते म्हणत आहेत. आता वीणाच्या जागी रश्मी अनपट ही भूमिका साकारणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा या मालिकेतील आर्याच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट झालीय, हे समोर येतेय. एका भूमिकेसाठी सतत अभिनेत्री बदलणे ही गोष्ट खटकत असली, तरी आता रश्मी या भूमिकेतून प्रेक्षकांना किती पसंत पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat replaces Veena Jagtap for Lead Character)

हेही वाचा :

‘पोपटा’पासून ते ‘आंटीची वाजवली घंटी’पर्यंतची हिट लोकगीतं कुणी लिहिलीय माहित्ये का?; एकदा वाचाच!

Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.