Phulala Sugandh Maticha: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या सेटवर पर्यावरण रक्षणासाठी कलाकारांनी घेतला पुढाकार

| Updated on: Aug 02, 2022 | 8:22 AM

जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर

Phulala Sugandh Maticha: फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवर पर्यावरण रक्षणासाठी कलाकारांनी घेतला पुढाकार
मालिकेच्या सेटवर पर्यावरण रक्षणासाठी कलाकारांनी घेतला पुढाकार
Image Credit source: Tv9
Follow us on

निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय. त्याचं हे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपण सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेतील कलाकारांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री अदिती देशपांडे (Aditi Deshpande) यांच्या पुढाकाराने सेटवरच्या प्लास्टिक (Plastic) बाटल्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ वापर करण्यात येत आहे. सेटवर पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या एकत्र जमा केल्या जातात. अदिती ताई या रिकामी बाटल्या दादर मधली गल्ली येथील ग्रीन इनिशिएटीव्ह या संस्थेला देतात.

प्लास्टिकच्या या निरुपयोगी बाटल्यांपासून इंधन निर्मिती केली जाते किंवा बागेत सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. गेले वर्षभर अदितीताई हा उपक्रम सेटवर राबवत आहेत. अदिती ताईंच्या या उपक्रमाला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील सर्वच कलाकार सहाय्य करत असून पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या सेटवरचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

हे सुद्धा वाचा

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कीर्तीच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे. जामखेडकर कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. कीर्तीच्या मालिकेतल्या प्रशिक्षणासाठी खऱ्याखुऱ्या एनसीसी कॅडेट टीमची नेमणूक करण्यात आली होती. एनसीसी कॅडेट व्हॅलेण्टाईन फर्नांडिस आणि त्यांच्या टीमने मालिकेतले हे रोमांचक प्रसंग साकारण्यासाठी मेहनत घेतली. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीने हे खडतर प्रशिक्षणाचे सीन पूर्ण केले होते.