AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: FIR ला सरकार का घाबरतंय? अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी राज ठाकरेंचा खोचक सवाल, म्हणाले काही काळंबेरं…

Raj Thackeray on Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलंच घेरलं. सरकारच्या त्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी सरकारला रोखठोक सवाल केला. काय म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray: FIR ला सरकार का घाबरतंय? अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी राज ठाकरेंचा खोचक सवाल, म्हणाले काही काळंबेरं...
राज ठाकरे यांचा रोकडा सवालImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 2:23 PM
Share

Raj Thackeray on Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार यांनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. अजितदादा पवार यांचा विमान अपघात की घातपात या मुद्दावर त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. रोहित पवार यांनी या भेटीची माहिती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. FIR ला सरकार का घाबरतंय? असा रोकडा सवाल त्यांनी सरकारला केला. तर सरकारच्या या भूमिकेमुळे काय होत आहे, यावर त्यांनी भाष्य केलं. लोकांच्या मनात अजितदादांच्या विमान घातपाताची शंका का दाटत आहे ,यावर त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

एफआयआर का नोंदवून घेतला जात नाही?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार हे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना गुन्हा का नोंदवला जात नाही, असा महत्त्वाचा प्रश्न विचारला. सरकारच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. एफआयआर का नोंदवून घेतला जात नाही. तीन तीन ठिकाणी दबाव का ठेवला जात आहे, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. त्यांचा एफआयआर नोंदवला जात नसेल तर सामान्य माणसाचं काय करायचं. आपल्यातील एक व्यक्ती गेली. दुर्देवी अपघात झाला. कुणाचाच अपघात होऊ नये. इतका दुर्देवी होऊच नये. अशावेळी एफआयाआरमध्ये काही त्रुटी मांडायच्या असेल त्या मांडल्या जाऊ देत नसतील तर महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला आहे. सरकारच अधिकार्‍यांना एफआयआर नोंदवून घेतलं जाऊ देत नाही तर अधिकार्‍यांना दोष देऊन काय फायदा असेही राज ठाकरे म्हणाले.

तर मग काळंबेरं…

सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसेल आणि अजितदादांसारख्यांबाबत तर यात काही काळंबेरं आहे का. असल्या गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात याच कारणाने संशय निर्माण होत आहे असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी सरकारचाच अगोदर कान धरला आहे. राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळेच जनतेच्या मनात घातापाताविषयी काळंबेरं असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.

सुनेत्रा पवार यांनी बोलायला हवं

राज ठाकरे यांनी केवळ सरकारला जाब विचारला नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कोर्टातही चेंडू टाकला आहे. तीन ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. तिथे नकार दिला जात असेल तर यंत्रणांवर दबाव आहे. या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे. पण सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सीबीआय चौकश्या होत राहतील. रोहित पवार यांचे सर्व मुद्दे मी ऐकले.एक एफआयआर आहे ना फक्त. त्या एफआयआरला सरकार का घाबरतं? या त्यांच्या प्रश्नानं सरकारच्या भूमिकेवरच मोठा सवाल उपस्थित केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...