AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salim Khan Health: 11 वा दिवस उजाडला तरीही सलमान खानचे वडील ICU मध्ये… प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Salim Khan Health: अभिनेता सलमान खान याचे वडील अद्यापही रुग्णालयात... ICU मध्ये सुरु आहेत उपचार... सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर..., सलीम खान रुग्णालायत असल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

Salim Khan Health: 11 वा दिवस उजाडला तरीही सलमान खानचे वडील ICU मध्ये... प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
सलीम खान
| Updated on: Feb 27, 2026 | 2:25 PM
Share

Salim Khan Health: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि बॉलिवूडचे लोकप्रिय लेखक सलीम खान अद्यापही तुरुंगात आहेत. गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. डॉक्टर जलिल पारकार यांच्या देखरेखीखाली तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्ण एक टीम सलीम खान यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. 90 वर्षांच्या सलीम खान यांना गेल्या आठवड्यात मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण सलीम खान यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळेल याच प्रतिक्षेत प्रत्येक जण आहे. याच दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सींग, सलीम खान यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर नात अलवीरा अग्निहोत्री देखील रुग्णलयात पोहोचली.

गेल्या आठवड्यात बुधवारी लीलावती रुग्णालयाने सलीम खान यांचं हेल्थ बुलेटिन पहिल्यांदा आणि शेवटचे प्रसिद्ध केले. डॉ. पारकर यांनी तेव्हा सांगितल्यानुसार, सलीम यांना त्यांच्या वयाचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्या दिवशी सकाळी त्यांच्यावर डीएसए शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तथापि, 11 व्या दिवसापर्यंत, त्यांना व्हेंटिलेटरवरून काढून टाकण्यात आले आहे की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.

सांगायचं झालं तर, गेल्या 11 दिवसांपासून कुटुंबातील सदस्य, जवळचे व्यक्ती, मित्र आणि इंडस्ट्रीतील अन्य कलाकार देखील सलीम खान यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. सलीम खान रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ICU मध्ये आहेत. त्यांना भेटण्याची कोणाला परवानगी नाही. पण संपूर्ण बॉलिवूड खान कुटुंबियांसोबत आहे.

सोमवारी अमृता अरोराचे पती शकील लडाक हे सर्वात आधी रुग्णालयात पोहोचले, त्यानंतर जरीन खान. मुलगी अर्पिता आणि मुलगा सोहेल खान, नातू अरहान हे देखील नंतर येताना आणि जाताना दिसले रमजानच्या या पवित्र महिन्यात सलिन खान यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

अनेक सेलिब्रिटी आणि चाहते देखील त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि सलिम खान यांना कधी डिस्चार्ज मिळेल याच प्रतीक्षेत आहे. अलिकडेच, अभिनेता एजाज खानने रुग्णालयात सलीम खान यांची भेट घेतली. त्यानंतर, त्यांनी माध्यमांना सांगितलं की, देवाच्या कृपेने, सलीम खान यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु, तसं झालं नाही. सलीम खान यांच्यावर अद्यापही रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

Follow Us
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट