जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन

बिग बॉस हिंदीच्या आगामी पर्वासाठी पहिला स्पर्धक अखेर समोर आला आहे. त्या स्पर्धकाने स्वत:च याबद्दलची घोषणा केली आहे.

जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन
Gunratna Sadavarte
| Updated on: Oct 03, 2024 | 4:15 PM

Gunratna Sadavarte In Bigg Boss Hindi : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस हिंदी कार्यक्रमाच्या १८ व्या पर्वाची चर्चा सतत चर्चा आहे. येत्या काही दिवसातच बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व सुरु होणार आहे. बिग बॉस हिंदीच्या आगामी पर्वासाठी पहिला स्पर्धक अखेर समोर आला आहे. त्या स्पर्धकाने स्वत:च याबद्दलची घोषणा केली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे आता एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतंच एक मोठी घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे लवकरच बिग बॉस हिंदीच्या 18 व्या पर्वात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता कार्यक्रमाला वेगळीच रंगत पाहायला मिळत आहे.

बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वात गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक म्हणून जाणार आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन घेतले आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांची त्यांच्या पत्नीला मिठी मारली आणि निरोप घेतला.

लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई सुरु

आगे आगे देखो, होता है क्या? मी काळजी करत नाही. मला लोक घाबरतात. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई सुरु आहे. जिंकण्या किंवा हरण्यासाठी खेळू नका, असा सल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

गुणरत्न सदावर्ते नेमके कोण?

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी होऊन आपली स्वत:च वेगळं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण केलं होतं. आपण कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या पाठिशी असलेला वकील असून डॉ. बाबासाहेबांचं संविधान हेच सर्वोत्कृष्ट मानतो, असे ते नेहमी बोलताना दिसतात. ते कायमच कायद्याची भाषा बोलत असतात. गुणरत्न सदावर्ते हे ओरडून बोलण्याच्या आणि वेगळ्याच स्टाईलमुळेही कायमच चर्चेत असतात.