Ankita Lokhande | लगीनं घटीका समीप आली, करा हो लगीन घाई! अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार!

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) यांनी अखेर लग्नगाठ बांधण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, विकी आणि अंकिता या डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत.

Ankita Lokhande | लगीनं घटीका समीप आली, करा हो लगीन घाई! अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार!
Ankita-Vicky
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 12:28 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) यांनी अखेर लग्नगाठ बांधण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, विकी आणि अंकिता या डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. 12, 13 आणि 14 या दिवशी ते लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. याबाबत  जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सूचित केले गेले आहे आणि अधिकृत आमंत्रणांवर अद्याप विचार केला जात आहे आणि लवकरच अधिकृत पत्रिका देखील लवकरच समोर येईल.

सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. नुकतेच येत्या डिसेंबरमध्ये कतरिना कैफ – विकी कौशल, नंतर राजकुमार राव – पत्रलेखा आणि आता अंकिता लोखंडे-विकी जैन लग्नबंधनात अडकण्याची चर्चा सुरु आहे.

साडेतीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात अंकिता-विकी!

नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीत अंकिता आणि विकीने कॅमेरासमोर दीर्घ चुंबन घेत खळबळ उडवून दिली होती.  या पार्टीचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते.

विकिसाठी शेअर केली होती खास पोस्ट :

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिचा माजी प्रियकर सुशांत सिंह राजपूत याच्या पहिल्या पुण्यतिथीच्या एका दिवसानंतर विकी जैनसाठी कौतुकाची पोस्ट शेअर केली होती. इंस्टाग्रामवर अंकिताने जोडीने एक फोटो पोस्ट केला होता आणि लिहिले होते की, “प्रिय विक्की, जेव्हा कठीण वेळ होती, तेव्हा तू माझ्यासाठी तिथे होतास. मी कशी आहे हे विचारणारा तू नेहमीच पहिला व्यक्ती होतास, मला काही मदत हवी असल्यास किंवा जर मला दूर जायचे असेल तर मला शांत करणारा तू होतास. तू नेहमी माझ्याबद्दल खूप काळजीत होतास आणि मी नेहमी तुला सांगितले की, मी ठीक आहे कारण मला माहित आहे की, तू माझ्यासोबत आहेस. जगातील सर्वोत्कृष्ट प्रियकर. मला काय हवे आहे हे मला सांगण्याची गरज नाही, परंतु तुला नेहमीच माहित असते की, मला काय हवे आहे…’

ती पुढे म्हणाली की, ‘मला नेहमी राजकन्येसारखी वागणूक दिल्याबद्दल, कितीही व्यस्त असलास तरी माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल, माझ्या कुटुंबाशी बंध जोडण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आणि माझ्या आणि माझ्या मित्रांसोबत हँग आउट केल्याबद्दल धन्यवाद. या छोट्या गोष्टींचा खूप अर्थ आहे. खूप काही. हेच आहे की, जे तू माझ्यासाठी खूप प्रिय आहेस. आम्ही खूप भाग्यवान आहोत. कधी कधी माझा यावर विश्वास बसत नाही. मी तुझ्यावर प्रेम करते कारण तू माझ्या पाठीशी उभा राहिलास, आणि तू वचन दिलेस की सर्व काही ठीक होईल. तू तुझे वचन पाळले, आणि तू नेहमीच माझ्यासाठी धावून आलास. त्याबद्दल, मी नेहमीच तुझी ऋणी राहीन. हे एक अतिशय आव्हानात्मक वर्ष आहे, आणि माझ्या पाठीशी तू आहेस हे जाणून छान वाटते आहे. यामुळे आता मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो.’

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री, जाणून घ्या अभिनेत्री नीता शेट्टीविषयी…

मंगळसूत्राच्या जाहिरातीवर कारवाईचा बडगा, अखेर नमतं घेत सब्यासाचीने हटवली ‘ती’ जाहिरात!