Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री, जाणून घ्या अभिनेत्री नीता शेट्टीविषयी…

‘बिग बॉस मराठी सीझन 3’च्या (Bigg Boss Marathi 3) नुकत्याच पार पडलेल्या चावडी स्पेशल एपिसोडमध्ये या स्पर्धेतील दुसऱ्या वाईल्ड-कार्ड स्पर्धकाचे स्वागत करण्यात आले आहे. हिंदी मालिका विश्वातील टीव्ही अभिनेत्री नीता शेट्टी (Neetha Shetty) हिने या स्पर्धेत एंट्री घेतली आहे.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री, जाणून घ्या अभिनेत्री नीता शेट्टीविषयी...
Neetha Shetty


मुंबई : ‘बिग बॉस मराठी सीझन 3’च्या (Bigg Boss Marathi 3) नुकत्याच पार पडलेल्या चावडी स्पेशल एपिसोडमध्ये या स्पर्धेतील दुसऱ्या वाईल्ड-कार्ड स्पर्धकाचे स्वागत करण्यात आले आहे. हिंदी मालिका विश्वातील टीव्ही अभिनेत्री नीता शेट्टी (Neetha Shetty) हिने या स्पर्धेत एंट्री घेतली आहे. अभिनेत्रीने धमाकेदार परफॉर्मन्स देत मंचावर प्रवेश करत सर्वांचे मनोरंजन केले आहे.

‘बिग बॉस मराठी 3’ या शोचे होस्ट, महेश मांजरेकर यांनी नीताचे स्टेजवर जोरदार स्वागत केले आणि तिला विचारले की, तिने दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला? यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, हे तिचे मोठे स्वप्न होते आणि या घरात प्रवेश करण्यासाठी ती खूप उत्साहित आहे. नीताने या घरामध्ये प्रवेश केला आणि तिला घरात पाहून उपस्थित सर्व स्पर्धक आश्चर्यचकित झाले.

कोण आहे नीता शेट्टी?

अभिनेत्री नीता शेट्टीबद्दल सांगायचे तर, नीता ‘धूंड लेगी मंझिल हमें’ या टीव्ही शोमधील ‘आरती’ या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. ‘एक दिन अचानक’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सियासत’, ‘सियासत’, ‘एमटीव्ही बिग एफ’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली आहे. तिने अनेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मराठीतही नीताची कमाल!

हिंदी मालिका विश्वात नाव कमावणाऱ्या अभिनेत्री नीता शेट्टीने मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या अभिनेत्रीने सुबोध भावे यांच्यासोबत ‘फुगे’ आणि ‘तुला कळणार नाही’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

पहिला वाईल्ड कार्ड 2 आठवड्यात घराबाहेर!

अभिनेता आदिषा वैद्य याची ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री झाली होती. घरात प्रवेश करताच त्याच्या हातात कॅप्टनपदाची धुरा सोपवण्यात आली होती. पहिल्याच आठवड्यात अनेक वाद आणि आततायीपणामुळे खूप चर्चेत आला होता. आदिश घरात प्रवेश करताच कॅप्टन झाला होता. त्याच्याकडे विशेष अधिकार देण्यात आले होते. घरात येताच त्याने घरातील कामे सगळ्यांमध्ये वाटून दिली होती.

यात त्याने जय, दादुस, मीनल यांना पाहरेकरी म्हणून निवडले होते. यांना तिघांना देखील रात्रभर दारावर उभे राहून पाहारा द्यायचा होता. यावेळी आपलं काम सोडून बसलेला जय पाहून आदिशने त्याला नियम समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर जयने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद जोर पकडतच होता की घरातील इतर स्पर्धकांनी मध्ये पडत दोघांना शांत केले. अवघ्या दोन आठवड्यात त्याला या वाईट खेळीमुळे घराबाहेर जावे लागले. त्यामुळे आता नीता या घरात कशी खेळते आणि किती दिवस टिकते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :

मंगळसूत्राच्या जाहिरातीवर कारवाईचा बडगा, अखेर नमतं घेत सब्यासाचीने हटवली ‘ती’ जाहिरात!

Happy Birthday Ishaan Khatter | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्समुळे चर्चेत ईशान खट्टर!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI