AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळसूत्राच्या जाहिरातीवर कारवाईचा बडगा, अखेर नमतं घेत सब्यासाचीने हटवली ‘ती’ जाहिरात!

मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या त्या आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल सेलिब्रेटी फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीने (Sabyasachi Mukherjee) अखेर माफी मागितली आहे. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे आणि एका विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली आहे.

मंगळसूत्राच्या जाहिरातीवर कारवाईचा बडगा, अखेर नमतं घेत सब्यासाचीने हटवली ‘ती’ जाहिरात!
सब्यासाची जाहिरात
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 11:17 AM
Share

मुंबई : मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या त्या आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल सेलिब्रेटी फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीने (Sabyasachi Mukherjee) अखेर माफी मागितली आहे. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे आणि एका विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली आहे. इतकेच नाहीतर त्यांनी ही जाहिरात देखील मागे घेतली आहे आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ती हटवून टाकली आहे.

फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनवरून वादात सापडला आहे. त्यांनी आपल्या लेबलची मंगळसूत्र जाहिरात मोहीम मागे घेतली असून, या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या इशाऱ्यानंतर सब्यासाची यांनी हे जाहीर वक्तव्य केले आहे. नरोत्तम मिश्रा यांनी त्यांना ही जाहिरात काढून टाकण्यासाठी त्याला 24 तासांचा अल्टिमेटम देऊन, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता.

काय म्हणाले सब्यासाची?

सब्यासाची मुखर्जीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी लिहिले, ‘वारसा आणि संस्कृतीला डायनामिक कान्सर्वेशन बनवण्याच्या संदर्भात, मंगळसूत्र मोहिमेचा उद्देश सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण याविषयी बोलण्याचा होता. या मोहिमेचा उद्देश एक सण म्हणून होता आणि त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला आहे, यामुळे आम्हाला देखील खूप दुःख झाले आहे. त्यामुळेच आम्ही ‘सब्यासाची’ने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’

पाहा पोस्ट :

नेमकं प्रकरण काय?

सब्यासाची मुखर्जी त्यांच्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीमुळे लोकांच्या निशाण्यावर आले होते. लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लाँच करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब केला आहे, त्यामुळे ते खूप ट्रोल होत आहेत. फॅशन डिझायनरच्या या मॉडेल्सनी डेनिम आणि ब्रा घालून फोटो सेशन केले होते, जे सोशल मीडिया यूजर्सना अजिबात आवडले नाही.

वाद का?

जाहिरातीत एका महिलेने ब्रा आणि मंगळसूत्र घातले आहे, तर सोबतचा पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो, जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला आपला जीवनसाथी बनवतो. या पवित्र नात्याला नजर लागू नये म्हणून काळे मणीही घातले जातात. पण सब्यासाचीने ज्याप्रकारे याचे सादरीकरण केले, त्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले.

मंगळसूत्राची किंमत ऐकलीत?

सब्यासाचीने त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर मंगळसूत्राच्या डिझाईनचा फोटो शेअर केला आहे. या मंगळसूत्राची किंमत तब्बल 1 लाख 65 हजार रुपयांपासून सुरू होते. मंगळसूत्राच्या प्रमोशनसाठी सब्यसाचीने त्याचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा :

Happy Birthday Ishaan Khatter | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्समुळे चर्चेत ईशान खट्टर!

Hina Khan : लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसला हीना खानचा क्लासी अंदाज, पाहा हटके फोटो

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.