Happy Birthday Ishaan Khatter | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्समुळे चर्चेत ईशान खट्टर!

बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter)  गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अलीकडेच ईशान अभिनेत्री अनन्या पांडेची काळजी घेताना आणि तिला वाईट दिवसात तिला साथ देताना दिसला. ईशान खट्टरसाठी आजचा दिवस खास आहे.

Happy Birthday Ishaan Khatter | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्समुळे चर्चेत ईशान खट्टर!
Ishaan Khatter
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter)  गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अलीकडेच ईशान अभिनेत्री अनन्या पांडेची काळजी घेताना आणि तिला वाईट दिवसात तिला साथ देताना दिसला. ईशान खट्टरसाठी आजचा दिवस खास आहे. आज (1 नोव्हेंबर) ईशानचा वाढदिवस आहे. ईशान खट्टरची बॉलिवूडमधील इनिंग अद्याप फार लांबली नाहीय, पण त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. या अभिनेत्याने ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

ईशान खट्टरचा (Ishaan Khatter) 1 नोव्हेंबर, 1995 रोजी मुंबईमध्ये जन्म झाला. ईशान खट्टर हा बॉलिवूड अभिनेत्री नीलिमा आझमी आणि अभिनेता राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. तर, तो शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. ईशान त्याचा सावत्र भाऊ शाहिद कपूरच्या खूप जवळचा आहे आणि त्याच्यासोबत वेळ घालवतो. ईशान खट्टरने त्याचे संपूर्ण शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आहे. ईशानने मुंबईतील RIMS इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

ईशान खट्टरची चित्रपट कारकीर्द

‘वाह लाईफ हो तो ऐसी’ नंतर ईशान 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता. 2017 मध्ये त्यांनी ‘हाफ विडो’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. यानंतर 2017 मध्ये तो ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ चित्रपटात काम करताना दिसला. पण हे सर्व चित्रपट त्याला हवी तशी ओळख देऊ शकले नाहीत. ईशान खट्टरला 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटातून यश मिळाले, ज्यामध्ये तो श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसला होता. या चित्रपटासाठी ईशानला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

‘अ सुटेबल बॉय’मुळे चर्चेत

‘धडक’ नंतर ‘अ सुटेबल बॉय’मुळे चांगलाच गदारोळ झाला होता. ईशान नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या सीरीजमध्ये दिसला होता. या चित्रपटातील एका दृश्यावरून बराच गदारोळ झाला होता. यामध्ये दाखवण्यात आलेले चुंबन दृश्य मंदिरात चित्रित करण्यात आले होते. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स

ईशान खट्टर ‘अ सुटेबल बॉय’ ही सीरीज आल्यापासून खूप चर्चेत होता. ईशानने त्यात स्वतःच्या वयापेक्षा दुप्पट वयाची असणाऱ्या अभिनेत्री तब्बूसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या सीरीजमध्ये ईशान आणि तब्बूचा किसिंग सीन देखील होता, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता.

हेही वाचा :

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितचा अनोखा अंदाज, ग्लॅमरस आणि हॉट स्टाईलमध्ये केलं फोटोशूट

Suhana khan : आर्यन खानच्या भेटीला पोहोचणार सुहाना, भावाला भेटण्यासाठी दुबईहून परतणार

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.