AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anupamaa: ‘अनुपमा’मधील ‘समर’चा करार रद्द; निर्मात्यांनी ‘या’ कारणामुळे व्यक्त केली तीव्र नाराजी

अभिनेता पारस कालनावतने (Paras Kalnawat) टीव्हीवरील लोकप्रिय शो 'अनुपमा'मध्ये (Anupamaa) समरची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

Anupamaa: 'अनुपमा'मधील 'समर'चा करार रद्द; निर्मात्यांनी 'या' कारणामुळे व्यक्त केली तीव्र नाराजी
Anupamaa: 'अनुपमा'मधील 'समर'चा करार रद्दImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 9:49 AM
Share

अभिनेता पारस कालनावतने (Paras Kalnawat) टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘अनुपमा’मध्ये (Anupamaa) समरची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. मालिकेत अनुपमाचा मुलगा समर हा उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर दाखवण्यात आला आहे. खऱ्या आयुष्यातही पारसला नृत्याची प्रचंड आवड आहे. आता तो आपल्या याच कलेची झलक आगामी ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) या डान्स शोमध्येही दाखवणार आहे. एकीकडे या बातमीने चाहते प्रचंड खूश असतानाच पारसला मालिकेच्या निर्मात्यांकडून मोठा फटका बसला आहे. कारण मालिकेच्या निर्मात्यांनी त्याचा करार संपुष्टात आणला आहे. निर्मात्यांचं म्हणणं आहे की पारसने त्यांना प्रतिस्पर्धी वाहिनीसोबत दुसरा प्रोजेक्ट साईन करण्यास मनाई केली होती. तरीसुद्धा पारसने दुसऱ्या वाहिनीसोबत करार केल्याने त्याचा करार रद्द केला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा प्रॉडक्शन हाऊसला कळलं की पारसने डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा 10 साइन केला आहे, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मालिकेच्या टीममधील कलाकारांचे निर्मात्यांशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. इतर प्रोजेक्ट्सची कामं करण्यापासून त्यांनी कधीही कोणाला रोखलं नव्हतं. पारसच्या बाबतीतही तेच होतं. पारसला इतर असाइनमेंट करण्यासाठी त्यांनी यापूर्वी तारखाही सांभाळल्या आहेत. पारसने या मालिकेत काम करतानाच अनेक म्युझिक व्हिडिओदेखील केले आहेत.

मालिकेचे निर्माते राजन शाही म्हणाले, “एक प्रॉडक्शन हाऊस म्हणून आम्ही कोणत्याही कराराचं उल्लंघन सहन करणार नाही. आम्ही सध्या मालिकेतील त्याचा करार टर्मिनेट केला आहे. आम्ही त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.” त्याच वेळी पारसने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं की अनुपमा या टीव्हीवरील नंबर वन शोचा भाग असूनही त्याने ‘झलक दिखला जा’ हा शो का निवडला? तो म्हणाला, “अनुपमा मालिकेसोबत सर्व काही ठीक होतं. पण त्यातील माझी भूमिका विकसित होत नव्हती. राजन सरांबद्दल आणि मालिकेच्या टीमबद्दलही मला खूप आदर आहे. तसंच मी त्यांना शुभेच्छा देतो. पण माझ्या करिअरच्या या टप्प्यावर मला काही नवीन आव्हानं स्वीकारायची आहेत. मी या निर्णयाबद्दल प्रॉडक्शनला सांगितलं होतं. मात्र कॉन्ट्रॅक्ट क्लॉज आणि चॅनलमुळे झलक दिखला जा साइन केल्यानंतर अनुपमा मालिकेत काम करत राहणं मला शक्य नव्हतं.”

‘झलक दिखला जा 10’चे स्पर्धक

‘झलक दिखला जा 10’ हा रिॲलिटी शो जवळपास पाच वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करणार आहे. या सिझनचं परीक्षण बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि चित्रपट निर्माता करण जोहर करणार आहेत. या शोची एकेकाळी स्पर्धक असलेली नोरा फतेही हीसुद्धा या दोन सेलिब्रिटींमध्ये सहभागी होणार आहे. या शोमध्ये पारस कलनावत व्यतिरिक्त निया शर्मा, नीती टेलर आणि शेफ जोरावर कालरा हे स्पर्धक झळकणार आहेत. त्याचबरोबर शाहीर शेख, हिना खान, शुभांगी अत्रे यांचीही नावं समोर येत आहेत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.