Video | अर्चना गाैतम एमसी स्टॅन याच्यावर भडकली? थेट म्हणाली…,व्हिडीओ व्हायरल

अर्चना गाैतम शांत बसायची आणि परत घरातील काही सदस्यांना टार्गेट करण्यास सुरूवात करायची. बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम, प्रियंका चाैधरी आणि साैंदर्या शर्मा या मैत्रिणी होत्या.

Video | अर्चना गाैतम एमसी स्टॅन याच्यावर भडकली? थेट म्हणाली...,व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 17, 2023 | 9:55 PM

मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये अर्चना गाैतम (Archana Gautam) हिने धमाका केला. काहीही कारण नसताना घरातील स्पर्धकांसोबत अर्चना अनेकदा भांडणे करताना दिसली. इतकेच नाही तर कोण बिग बाॅसच्या घरात काम करत नाही त्यालाही अर्चना टार्गेट करायची. अनेकदा ती घरातील तिच्या जवळच्या मैत्र आणि मैत्रिणींसोबतही भांडणे करताना दिसली. साजिद खानसोबत झालेल्या वादामध्ये तर अर्चना गाैतम हिने थेट बाप काढला. शिव ठाकरे याच्यासोबत झालेल्या वादामध्ये तिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. एमसी स्टॅन याच्यासोबत मोठे भांडणे अर्चना गाैतम हिचे बिग बाॅसच्या घरात असताना झाले होते. यादरम्यान तिने एमसी स्टॅन (MC Stan)  याच्या चाहत्यांना उद्देशून बऱ्याच गोष्टी बोलल्या होत्या. एक टास्क बिग बाॅसने घरातील सदस्यांना दिला होता. यादरम्यान तिने थेट बिग बाॅसलाच धमकी दिली होती. अनेकदा सलमान खान यानेही अर्चना गाैतम हिचा क्लास लावला. मात्र, थोड्या वेळासाठी अर्चना गाैतम शांत बसायची आणि परत घरातील काही सदस्यांना टार्गेट करण्यास सुरूवात करायची. बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम, प्रियंका चाैधरी आणि साैंदर्या शर्मा या मैत्रिणी होत्या.

फिनाले विकमध्ये बिग बाॅसने घरातील सदस्यांना एका टास्क दिला होता. त्या टास्कमध्ये अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि निम्रत काैर यांच्या डोळ्यात थेट हळद, मीठ आणि नीरमा टाकला होता. अर्चना गाैतम हिचे हे खतरनाक रूप पाहून बिग बाॅसने मध्येच टास्क थांबवण्याच्या सुचना दिल्या होत्या.

अर्चना गाैतम ही चाैथ्या क्रमांकावर बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडली. यावेळी अर्चना गाैतम रडताना दिसली होती. बिग बाॅसच्या घरात कधीच अर्चना गाैतम आणि एमसी स्टॅन यांचे जमले नाही, हे दोघे सतत भांडणे करताना दिसायचे. फिनालेच्या दोन दिवस अगोदरही यांच्यामध्ये वाद झाला होता.

बिग बाॅसच्या घरात असताना एमसी स्टॅन हा कायमच अर्चना गाैतम हिला शेमडी म्हणायचा. सध्या सोशल मीडियावर अर्चना गाैतम हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यावर पैपराजी यांनी अर्चना गाैतम हिला शेमडी एमसी स्टॅन बिग बाॅसच्या घरात म्हणायचा यावर विचारले असता.

अर्चना गाैतम म्हणाली की, तो फक्त मलाच नाही तर प्रियंकाला देखील म्हणायचा. यावेळी एका शेमडी अर्चना गाैतम हिला म्हणण्यात आले, अर्चना गाैतम म्हणाली की, शेमडी म्हटले ते मार मार के मोर बना दूंगी…आता अर्चना गाैतम हिचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. अनेकांनी यावर कमेंट करत म्हटले आहे की, हिने ही धमकी एमसी स्टॅन याला दिली आहे.