Bigg Boss 16 | ‘बिग बॉस 16’च्या घराची पहिली कॅप्टन निम्रत कौर, वाचा काय घडले?

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 02, 2022 | 8:02 AM

बिग बॉस 16 ची यंदाची थीम सर्कस आहे. 16 व्या सीजनमध्ये निम्रत कौर सर्वात अगोदर बिग बॉसच्या घरात दाखल झाली. विशेष म्हणजे निम्रत बिग बॉस 16 व्या सीजनची पहिली कॅप्टन देखील झालीये.

Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16'च्या घराची पहिली कॅप्टन निम्रत कौर, वाचा काय घडले?

मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चे जबरदस्त असे प्रीमियर पार पडले आहे. बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक आता घरात दाखल झाले असून बिग बॉसला 16 व्या सीजनची पहिली कॅप्टन (Captain) देखील मिळालीये. प्रेक्षकांमध्ये सुरूवातीपासूनच बिग बॉस (Bigg Boss) 16 बद्दल प्रचंड उत्सुकता होती. शेवटी काल प्रीमियरमध्ये घरात नेमके कोणते स्पर्धेक सहभागी होणारे हे कळाले आहे. कलर्स टीव्हावरील फेमस मालिका उडारियामधील तेजू आणि फत्ते दोघेही बिग बॉसला 16 मध्ये दाखल झाले आहे.

बिग बॉस 16 ची यंदाची थीम सर्कस आहे. 16 व्या सीजनमध्ये निम्रत कौर सर्वात अगोदर बिग बॉसच्या घरात दाखल झाली. विशेष म्हणजे निम्रत बिग बॉस 16 च्या सीजनची पहिली कॅप्टन देखील झालीये. म्हणजेच काय तर पुढील काही दिवस बिग बॉसच्या घरामध्ये निम्रत कौरचे राज चलणार आहे. बिग बॉसने निम्रतला घरातील सदस्यांना काम वाटून देण्यासही सांगितले.

बिग बॉसने निम्रत कौरला विशेष अधिकार देत कोणत्या सदस्याला कोणता बेड आणि कोणत्या बेडरुममध्ये झोपू द्यायचे याचा अधिकार दिला. पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात थोडा वाद होताना दिसला. मात्र, यंदाचे सीजन खास ठरणार असल्याचे कळत आहे. बिग बॉसमध्ये सर्वात जास्त साजिद खानच्या नावाची चर्चा आहे. साजिद खानमुळे बिग बॉसचा टीआरपी वाढण्याची देखील शक्यता आहे.

बिग बॉस 15 मध्ये निर्मात्यांनी अनेक प्रयत्न करूनही टीआरपीमध्ये काही खास कमाल करता आली नव्हती. बिग बॉस 15 ला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे आता बिग बॉस 16 काय कमाल करणार हे पाहण्यासारखे नक्कीच ठरणार आहे. बिग बॉस 13 नंतर कुठलेच सीजन काही खास कमाल करून शकले नाहीये. मात्र, निर्मात्यांना आता बिग बॉस 16 कडून प्रचंड अपेक्षा आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI