निक्की तांबोळीचे किस प्रकरणावर मोठे भाष्य, म्हणाली…

अभिनेत्री निक्की तांबोळी ‘बिग बॉस 14’ (Big Boss 14) मधील वादग्रस्त सदस्य होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:44 PM, 2 Mar 2021
निक्की तांबोळीचे किस प्रकरणावर मोठे भाष्य, म्हणाली...

मुंबई : अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ‘बिग बॉस 14’ (Big Boss 14) मधील वादग्रस्त सदस्य होती. निक्कीला अनेक वेळा सलमान खानने (Salman Khan) देखील रागावले होते. कारण निक्की घरातील प्रत्येक सदस्याला उलटे बोलताना होती. बिग बॉसच्या घरात असताना निक्कीने जान कुमार सानूवर एक गंभीर आरोप केला होता. (Big Boss 14 | Nikki Tamboli’s explanation on the kissing incident)

टास्क दरम्यान माझ्या मर्जीविरोधात त्याने किस केले असा आरोप जानवर निक्कीने लावला होता. त्यानंतर बराच वाद बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर बघायला मिळाला. निक्कीच्या या आरोपावर जानच्या आईने देखील प्रतिक्रिया दिली होती. नुकताच, निक्कीने स्पॉटबॉयला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने जानवर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देत म्हणाली आहे.

बिग बॉसच्या घरात माझे आणि जानचे रिलेशन खूप वेगळे होते कधी आम्ही भांडण करत होतो तर कधी आम्ही चांगले मित्र म्हणून राहत होतो. मैत्रीमध्ये मिठी मारणे किंवा किस करणे ही काही मोठी गोष्ट नाही. परंतू मला एका टास्क दरम्यान नॉमिनेट केलं होत त्यामुळे मी खूप रागात होते त्यामुळे जान मला समजवण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, मी खूप रागात होते आणि त्याच दरम्यान त्याने माझ्या मर्जीविरुद्ध किस मला केले मला ते अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे मी घडलेला प्रकार घरातील सदस्यांना सांगितला. मात्र, ज्यावेळी निक्कीने सांगितले की, माझ्या मर्जीविरुद्ध जानने माझी किस केली. त्यानंतर मोठे वादळ बघायला मिळाले होते. या प्रकरणावर जानला सलमान खानने सुध्दा समज दिला होता. परंतू निक्कीने यासर्व प्रकरणावर आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे.

संबंधित बातम्या : 

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका

परिणीती चोप्राचा ‘सायना’ चित्रपट ‘या’ तारखेला चाहत्यांच्या भेटीला!

आधी अथिया आता ‘तडप’ मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार सुनील शेट्टीचा मुलगा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

(Big Boss 14 | Nikki Tamboli’s explanation on the kissing incident)