सलमान खान याने काढली अर्चना गाैतमची खरडपट्टी, वाचा काय घडले?

यावेळी सलमान खानने अर्चना खूप काही सुनावले. अर्चनाने बिग बाॅसच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते.

सलमान खान याने काढली अर्चना गाैतमची खरडपट्टी, वाचा काय घडले?
| Updated on: Nov 05, 2022 | 8:38 AM

मुंबई : बिग बाॅसचा विकेंड का वार खतरनाक झाला. सलमान खानने शालिन भनोट, अर्चना गाैतम आणि साजिद खानचा क्लास घेतला. यावेळी सलमान खानने अर्चनाला खूप काही सुनावले. अर्चनाने बिग बाॅसच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. शालिनला सलमान खान म्हणाला की, लोक चिकन खाण्यासाठी हाॅटेलमध्ये जातात. मात्र, तू चिकन खाण्यासाठी बिग बाॅसच्या घरात आला आहेस. तू फक्त शोमध्ये चिकन मागताना दिसत आहे. बाहेर प्रेक्षकही तुझ्यावर टीका करत आहेत.

कलर्सने एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान खान विचारतो की, ‘साजिद बिग बाॅसच्या घराच्या आत काय चालले आहे?’ तर साजिद खान म्हणतो की, ‘वक्त आने पे पत्ते देखूंगा.’ सलमान खानवर यावर साजिद खानला म्हणतो की, वेळ कधीच येत नाही. तू गेम कधी खेळणार…एक प्रकारे सलमान खानने साजिद खानला समोर येऊन गेम खेळण्याचा सल्ला दिला आहे.

गाैतमने घरातील सर्व राशन देऊन कॅप्टन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. घरातील सर्व सदस्यांनी गाैतमला दोषी ठरवले होते. आता या आठवड्यात सर्वांच्या आवडता अब्दू बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी अब्दूने घरातील सर्व सदस्यांना काम वाढून दिले आहे. विशेष म्हणजे सर्वांनी अब्दूचे ऐकले पण आहे.