अब्दु रोजिक भारतामध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत? म्यूझिक व्हिडीओसोबत छोटा भाईजान या व्यवसायामध्ये करणार पदार्पण
विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यापासून अब्दु रोजिक हा धमाका करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अब्दु रोजिक याने मंडळीसाठी आणि बिग बाॅस 16 मधील काही स्पर्धेकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अब्दु रोजिक (Abdu Rozik) याचे नाव भारतामध्ये चर्चेत आहे. अब्दु रोजिक याने बिग बाॅस 16 मध्ये सहभाग घेतल्यापासून भारतामध्ये त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त वाढली आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये असताना अब्दु रोजिक याने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन देखील केले. अब्दु रोजिक याची हिंदी देखील लोकांना प्रचंड आवडली आहे. बिग बाॅसच्या घरात असताना अब्दु रोजिक हा शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यासोबत धमाल करताना दिसला. छोट्याशा अब्दु रोजिक याने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख भारतामध्ये निर्माण केलीये. बिग बाॅस 16 मधील सर्वांचा लाडका स्पर्धेक हा अब्दु रोजिक होता.
विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यापासून अब्दु रोजिक हा धमाका करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अब्दु रोजिक याने मंडळीसाठी आणि बिग बाॅस 16 मधील काही स्पर्धेकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मध्येच अब्दु रोजिक याला छोटा भाईजानचा टॅग मिळाला असून सलमान खान हा बडा भाईजान आणि अब्दु रोजिक हा छोटा भाईजान. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत होती की, अब्दु रोजिक हा सलमान खान याच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
नुकताच अब्दु रोजिक हा तजाकिस्तानला जाताना स्पाॅट झाला. यावेळी अब्दु रोजिक याने पैपराजी यांना मोठे गिफ्ट सर्वांना देणार असल्याचे जाहिर केले. विशेष म्हणजे आता तजाकिस्तान सोडून अब्दु रोजिक हा मुंबईमध्ये शिफ्ट होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून त्याला बाॅलिवूडच्या बऱ्याच आॅफर देखील येत आहेत.
इतकेच नाही तर अभिनयासोबत अब्दु रोजिक हा मुंबईमध्ये स्वत: चा एक व्यवसाय देखील सुरू करणार आहे. मुंबईमध्ये अब्दु रोजिक हा एक भारतीय रेस्टॉरंट उघडत आहे स्पेशल बर्गरचे. आता अब्दु हा तजाकिस्तान गेला असून भारतामध्ये 6 मार्चला परत येणार आहे. त्याने त्याचा या रेस्टॉरंटमध्ये येण्याची विनंती पैपराजी यांच्यासोबत चाहत्यांना देखील केलीये.
रेस्टॉरंटसोबत अब्दु रोजिक याचे काही म्यूझिक व्हिडीओही लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. मुळात म्हणजे अब्दु रोजिक हा तजाकिस्तानचा गायक असून गेल्या काही काळापासून त्याची फॅन फाॅलोइंग भारतामध्ये जबरदस्त वाढल्याचे दिसत आहे. भारतामध्ये अब्दु रोजिक याला खरी ओळख बिग बाॅस 16 मधून मिळालीये.
