Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरीने केला कहर, म्हणाली की जेवण फक्त…

प्रियंका आणि निम्रतमध्ये जोरदार राडा होताना दिसतोय. शिव ठाकरे आणि निम्रतला जास्त जेवण दिले जाते,

Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरीने केला कहर, म्हणाली की जेवण फक्त...
| Updated on: Nov 08, 2022 | 7:41 AM

मुंबई : बिग बाॅसचे सीजन चांगलेच रंगात आले असून स्पर्धेकांचा घरात जोरदार हंगामा बघायला मिळतोय. गाैतम आणि साैंदर्या यांनी तर खुल्लम खुल्ला प्रेम करू असे ठरवले आहे. बिग बाॅसच्या घरात खाण्यावरून प्रियंका आणि निम्रतमध्ये जोरदार राडा होताना दिसतोय. शिव ठाकरे आणि निम्रतला जास्त जेवण दिले जाते, घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत असा गंभीर आरोप प्रियंका चाैधरीने केला आहे. प्रियंकाचा हा आरोप ऐकल्यानंतर निम्रतचा चांगलाच पारा चढल्याचे बघायला मिळाले.

बिग बाॅसच्या घरात यापूर्वीही अनेकदा जेवणावरून मोठे राडे झाले आहेत. मात्र, पहिल्यांदाच जेवण कमी जास्त वरून वाद होताना दिसला. प्रियंका बिग बाॅसच्या घरातील अत्यंत वादग्रस्त स्पर्धेक दिसत आहे. कोणाचे भांडण असो किंवा कोणताही वाद असो काही देणे घेणे नसताना देखील प्रियंका त्यामध्ये उडी घेते आणि वाद वाढवते.

गौतम विज आणि सौंदर्या शर्मा यांची लव्ह केमिस्ट्री याआधीच चर्चेत आली आहे. काही चाहते याला फेक असल्याचे म्हणत आहेत. घरातील सर्वच सदस्यांना असे वाटते की, गाैतम आणि साैंदर्या शोमध्ये राहण्यासाठी फेक लव्ह करत आहेत. सौंदर्या शर्मा आणि गाैतम विजच्या लव्हला करण जोहरने देखील फेक असल्याचे म्हटले होते.