Bigg Boss 16 | अखेर ‘बिग बॉस 16’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे आता जवळपास समजलेच आहे. बिग बॉसचे निर्माते प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीयेत.

Bigg Boss 16 | अखेर 'बिग बॉस 16' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 30, 2022 | 11:45 AM

मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16 ) नेमके कधी सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून प्रीमियरची तारीख देखील रिलीज (Release) करण्यात आलीये. बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे आता जवळपास समजलेच आहे. बिग बॉसचे निर्माते प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एकही संधी सोडत नसून सातत्याने सोशल मीडियावर (Social media) बिग बॉस 16 संदर्भातील व्हिडीओ शेअर केले जात आहेत.

मिळालेल्या रिपोर्टनुसार बिग बॉस 16 ऑक्टोबरच्या 8 तारखेपासून कर्लस टीव्हीवर प्रसारित होणार आहे. सुरूवातीला बिग बॉस 1 ऑक्टोबरपासून प्रसारित होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, नवीन माहितीप्रमाणे 8 ऑक्टोबरपासून बिग बॉस 16 प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

बिग बॉस 16 ची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. आता शोची ऑन एअर रिलीज डेटही पुढे आलीये. सुरूवातीला 1 ऑक्टोबरपासून शो ऑन एअर जाईल असे सांगितले जात होते. मात्र, ऑनलाइन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार शो 8 ऑक्टोबरपासून चाहत्यांच्या भेटीला येईल.

खतरो के खिलाडी फेम कनिका मान बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, निर्मात्यांसोबत चर्चा होऊनही कनिका बिग बॉस 16 च्या घरात दिसणार नाहीये. बिग बॉस 16 मध्ये एका वेगळ्या रूपामध्ये इमली अर्थात आपल्या सर्वांची लाडकी सुंबुल तौकीर दिसणार आहे.

यंदाची बिग बॉसमधील थीम खास असणार आहे. इतकेच नाही तर यापूर्वीच्या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात फक्त एकच बेडरूम असायची. यावेळी तब्बल 4 बेडरूम आहेत. सलमान खान बिग बॉस 16 ला होस्ट करणार आहे. मध्यंतरी बिग बॉस 16 ला होस्ट करण्यासाठी सलमान खान तब्बल 1000 कोटी फी घेत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, त्यानंतर स्वत: सलमान खानने खुलासा केला.

सलमान खान म्हणाला की, जर खरोखरच मला इतकी मोठी फी मिळत असती तर मी आयुष्यात कधीच काम केले नसते. या बातम्या फक्त प्रेक्षक आणि चाहतेच वाचत नसतात तर अशा बातम्या ईडीवाले पण वाचतात. मग ते माझ्या घरी येतात आणि यामध्ये काही तथ्य नसल्याचे त्यांना नंतर कळते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें