AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18: ‘आगे आगे देखो होता है क्या…’, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच गुणरत्न सदावर्तेंची जोरदार टोलेबाजी

gunratna sadawarte in Bigg Boss 18: माझी लढाई सर्वसामान्यांना माहीत आहे. माझी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी स्पर्धा असू शकते. कारण त्यांचाबाबतचा विषय सर्वसामान्यांचा जीवन मरणाचा विषय असतो. परंतु इतर सर्वांसोबत भाऊ, भाऊंचे नाते असणार आहे

Bigg Boss 18: 'आगे आगे देखो होता है क्या...', बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच गुणरत्न सदावर्तेंची जोरदार टोलेबाजी
Bigg Boss 18 gunratna sadawarte
| Updated on: Oct 04, 2024 | 10:52 AM
Share

gunratna sadawarte in Bigg Boss 18: दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात चर्चेचा शो ठरलेला रियलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीजन सुरु होत आहे. येत्या 6 ऑक्टोंबर रोजी बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर रात्री 9 वाजता होणार आहे. या शोचा प्रीमियर कलर्स आणि जिओ सिनेमावर दिसणार आहे. यंदा हा शोध अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. त्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सदावर्ते गुरुवारी घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला आणि जोरदार राजकीय टोलेबाजी करत बिग बॉसची झलक दाखवली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना टोले लगावले. या शोमध्ये गुणरत्न सदावर्तेसह एकूण 18 कन्टेस्ट असणार आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते

बिग बॉसचा 18 वा सीजनमध्ये सहभागी होण्यापूर्वी बिग बॉससारखा पोशाख करुन गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ते म्हणाले, ‘हम सदावर्ते है, इसका मतलब जान लो, … आगे आगे देखो होता है क्या…’ सलमान खान हॉस्ट असल्यामुळे तुमच्यावर काही काही दडपण आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात सदावर्ते म्हणाले, ‘हमारा नामही काफी है…हम गणरत्न है…लोग हमसे डरते है. हम डंके की चोट पर बोलते है. हम कभी फिकर नही करते’

ट्रॉफी जिंकणे हा उद्देश नाही तर…

आमच्या समोर कोणतेही लढाई होणार नाही. बिग बॉसची ट्रॉफी जिंकणे हा उद्देश नाही, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हा आपला उद्देश आहे. चॅनलशी संपर्क कसा झाला, त्यावर त्यांनी गंमतीदार उत्तर दिले. ते म्हणाले, चांगली माणसे चांगल्या माणसांच्या शोधात असतात. स्पर्धेत जिंकण्यापेक्षा शांती अन् समुद्ध महत्वाची आहे, असे ते म्हणाले.

शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला

गुणरत्न सदावर्ते नेहमी विविध खटले दाखल करत असतात. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धकांवर खटला दाखल करणार का? त्यावर ते म्हणाले, माझी लढाई सर्वसामान्यांना माहीत आहे. माझी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी स्पर्धा असू शकते. कारण त्यांचाबाबतचा विषय सर्वसामान्यांचा जीवन मरणाचा विषय असतो. परंतु इतर सर्वांसोबत भाऊ, भाऊंचे नाते असणार आहे.

बिग बॉस हिंदीच्या 18 सिजनमध्ये गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक असणार आहे. त्यांना इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळाल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची पत्नी जयश्री पाटील हिला मिठी मारत निरोप दिला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.