‘तो इतकं मारायचा की घरी जायचीही भीती वाटायची…’, स्नेहा वाघने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सांगितली आपबिती!

लोकप्रिय टीव्ही मालिका 'इक वीर दी अर्दास-वीरा' फेम टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) या दिवसांमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. शो दरम्यान, स्नेहाने तिच्या दोन अयशस्वी लग्नांचा उल्लेख केला, त्यानंतर ती सतत चर्चेत राहिली.

‘तो इतकं मारायचा की घरी जायचीही भीती वाटायची...’, स्नेहा वाघने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सांगितली आपबिती!
Sneha Wagh-Avishkar

मुंबई : लोकप्रिय टीव्ही मालिका ‘इक वीर दी अर्दास-वीरा’ फेम टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) या दिवसांमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. शो दरम्यान, स्नेहाने तिच्या दोन अयशस्वी लग्नांचा उल्लेख केला, त्यानंतर ती सतत चर्चेत राहिली. तिचा पहिला पती अविष्कर दारवेकर देखील स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी झाला आहे. स्नेहा अनेक हिंदी टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

स्नेहा वाघ हिंदी टीव्हीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने इमॅजिन टीव्हीच्या शो ‘ज्योती’ मधून प्रेक्षकांवर छाप पाडली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत ‘मुरा’ची भूमिका साकारली आणि नंतर ती ‘वीरा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. नुकतीच तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आपली आपबिती सांगितली.

तो मला खूप मारायचा…

स्नेहाचे पहिले लग्न अविष्कर दारवेकर यांच्याशी झाले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असे स्नेहा सांगते. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. यावेळी आपली आपबिती सांगताना स्नेहा म्हणाली की, ‘एक वेळ अशी होती की, मला घरी जायची देखील भीती वाटायची.. शूटवर जाताना देखील माझी अर्धी शुद्ध हरपलेली असायची. अशावेळी सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घायायचे. अनेकदा शूट करतानासुद्धा मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या…’

आता काही करू दे…

स्नेहा म्हणते, आता तो कसाही असला तरी त्याने काही फरक पडत नाही. मी त्याने केलेल्या गोष्टी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी आई-वडिलांकडे पळून जायचे, घाबरायचे.. मात्र, आता मी ती स्नेहा नाही. आता स्नेह बदलली आहे. त कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही. त्यामुळे आता काही झालं तरी मी लढायला समर्थ आहे. स्नेहा ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सुरेखा कुडुची यांना ही आपबिती सांगत होती.

दुसरे लग्नही अयशस्वी

स्नेहाने 2015 मध्ये इंटिरिअर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत दुसरे लग्न केले होते. पण तिचे ते लग्नही फार काळ टिकू शकले नाही. स्नेहा अवघ्या 8 महिन्यांनंतर पतीपासून विभक्त झाली. जरी दोघे अधिकृतपणे घटस्फोटित नसले, तरी ती म्हणते की ती लवकरच त्याला घटस्फोट देईल.

‘बिग बॉस शो’ दरम्यान, स्नेहा, तिच्या दोन्ही अयशस्वी लग्नांचा उल्लेख करताना म्हणाली की, तिला असे वाटते की पुरुषांना मानसिकदृष्ट्या मजबूत महिला आवडत नाहीत. टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने तिच्यावर शो दरम्यान घटस्फोटाबद्दल बोलल्याबद्दल व्हिक्टीम कार्ड खेळल्याचा आरोप केला आहे. काम्याने ट्विट केले की, ती अशा प्रकारे बोलून या गेमला वाईट बनवत आहे.

अफेअर चर्चेत

तिच्या अपयशी लग्नाव्यतिरिक्त स्नेहा स्वतःहून 11 वर्षांनी लहान असलेल्या फैसलला डेट केल्यामुळेही ती चर्चेत राहिली आहे. तथापि, या अहवालांना दोन्ही बाजूंनी अफवा असल्याचे म्हटले गेले.

हेही वाचा :

Lakme Fashion Week 2021 : अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताने आपल्या साध्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं, पाहा लॅक्मे फॅशन वीकची खास झलक

भाऊ आर्यन खान अटकेत, तर लेक सुहानाची आई गौरीसाठी बर्थडे पोस्ट! शुभेच्छा देताना म्हणाली…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI