AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ आर्यन खान अटकेत, तर लेक सुहानाची आई गौरीसाठी बर्थडे पोस्ट! शुभेच्छा देताना म्हणाली…

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) दोघेहे ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळत आहेत आणि आर्यनच्या अटकेनंतर त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. शाहरुख आणि गौरीप्रमाणेच त्यांची मुलगी सुहाना हिनेही यावेळी सोशल मीडियापासून अंतर ठेवले आहे.

भाऊ आर्यन खान अटकेत, तर लेक सुहानाची आई गौरीसाठी बर्थडे पोस्ट! शुभेच्छा देताना म्हणाली...
Suhana-Gauri
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 11:17 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) दोघेहे ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळत आहेत आणि आर्यनच्या अटकेनंतर त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. शाहरुख आणि गौरीप्रमाणेच त्यांची मुलगी सुहाना हिनेही यावेळी सोशल मीडियापासून अंतर ठेवले आहे. मात्र, आता आई गौरीच्या वाढदिवसानिमित्त सुहानाने खास पोस्ट शेअर केली आहे.

गौरी खान आज (8 ऑक्टोबर) तिचा 51वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर तिची मुलगी सुहानाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सुहानाने शाहरुख आणि गौरीचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे.

आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुहानाने शाहरुख आणि गौरीच्या फोटोशूटमधील ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. ज्यात शाहरुख गौरीला मिठी मारत आहे. फोटो शेअर करताना सुहानाने लिहिले – ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माँ’. या सोबतच हार्ट इमोजी देखील पोस्ट केले.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सेलेब्सने केली टिप्पणी

सुहानाच्या पोस्टवर तिची चुलत बहीण आलिया चिब्बाने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. त्याचवेळी सुहानाची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेनेही पोस्टवर कमेंट केली. सुहानाची पोस्ट अल्पावधीत हजारो लोकांनी पसंत केली आहे.

कठीण काळात शेअर केलेली पोस्ट

शाहरुख खानचे कुटुंब सध्या कठीण अवस्थेतून जात आहे. त्याचा मोठा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यनला गुरुवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आज त्याचे वकील त्याची जामीन याचिका दाखल करणार आहेत.

हृतिक रोशनने केलेली पोस्ट व्हायरल

गुरुवारी हृतिक रोशनने सोशल मीडियावर आर्यन खानच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर अनेक सेलेब्सनी त्या पोस्टवर कमेंट केल्या. हृतिकची पोस्ट वाचल्यानंतर सुहाना खान स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने त्यावर प्रतिक्रिया दिली. सुहानाने हृतिकच्या पोस्टवर टिप्पणी केली नाही पण तिला ही पोस्ट आवडली.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकून एनसीबीने आर्यन खानला अटक केली. आर्यनसह 7 लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

जामीन मिळणार का?

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. मात्र आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी आज (शुक्रवार 8 ऑक्टोबर) होणार आहे. आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो ‘मन्नत’वर जाणार, याचा फैसला होणार आहे.

कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर सात आरोपी तसेच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला.

हेही वाचा :

Gauri Khan Birthday: कोठडीतल्या पोरासाठी जी बर्गर घेऊन गेली, एका सुपरस्टारचं जिनं घर सांभाळलं

Marathi Movie : रहस्यमय ‘अलिप्त’ आता प्रदर्शनासाठी सज्ज; थरार अनुभवायला मिळणार?

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.