मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोरदार सुरुवात झाली आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱ्याअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.
घरात पहिल्याच दिवशी स्पर्धक मीरा जगन्नाथ हिने जय दुधाणेसोबत एका टॉवेलवरून वाद घालायला सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी सुरुवात झालेली ही वादांची मालिका घरात अविरत सुरूच आहे. मात्र, या सगळ्यात गायत्री आणि मीरा प्रेक्षकांच्या नापसंतीसपात्र ठरू लागल्या आहेत. मीराची सततची कटकट आणि गायत्रीचं तिच्या मागे मागे फिरणं प्रेक्षकांना रुचत नाहीये. नेटकरी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
‘मीरा स्वतःला फार शहाणी समजते, तिला असं वाटत की मीच विजेती होणार. ती सोनालीला भाषेवरून बोलते, ती गावाकडची भाषा वापरते तीच तिची ओळख आहे, आणि तुमच्या हायफाय इंग्रजी पेक्षा तिची भाषा जवळची वाटते प्रेक्षकांना’, अशी कमेंट करत एका प्रेक्षकाने मीराला चांगलेच बोल सुनावले आहेत. तर, मीरा फेक खेळते आहे आणि मोठ्या माणसांना आदर देत नाही, असा आरोप देखील एका चाहत्याने केला आहे. मीराला एक आठवडा मौन राहण्याचा टास्क देण्यात यावा, ती खूप निगेटिव्ह बोलते, असं देखील एका प्रेक्षकाने सुचवले आहे.
View this post on Instagram
तर, गायत्रीला मीराच्या मागेमागे करण्यामुळे ट्रोल केलं जात आहे. स्वतः महेश मांजरेकर यांनी शनिवारी ‘बिग बॉसची चावडी’ या भागात गायत्रीला यावरून बोल लगावले होते.
या सगळ्या वादावादीत गायत्री दातार मात्र प्रेमात पडली आहे. तिने आपलं प्रेम अगदी जाहीरपाने व्यक्त केलं आहे. गायत्री ज्याच्या प्रेमात पडलीये ती कोणी व्यक्ती नसून, बिग बॉसचं घर आहे. गायत्रीने बिग बॉसच्या कॅमेरा समोर उभं राहत हटके अंदाजात आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. घरात काहीही सुरु असो, मी मात्र या घराच्या प्रेमात पडलेय, असं गायत्रीने म्हटलं आहे. दुसरीकडे या घरात गायत्रीची दोन स्पर्धकांसोबत चांगली गट्टी जमली आहे. यातील एक आहे मीरा जगन्नाथ, तर दुसरा आहे जय दुधाणे. जयबरोबर गायत्रीची मैत्री आता अधिक घट्ट होऊ लागल्याने, ती त्याच्या प्रेमात तर नाही ना, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
View this post on Instagram