केसाच्या गुंत्यावरुन ‘बिग बॉस मराठी’त रामायण, वर्षा ताई, पॅडी दादा आणि अभिजीतमध्ये “तू तू मै मै”
दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आता केसांचा गुंतावरुन नवीन रामायण घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi 5 season : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठी कार्यक्रमाला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या घरात कधी कोणाचं कोणाशी भांडण होईल, याचा काहीही नेम नाही. बिग बॉसमध्ये खेळ खेळताना सर्व सदस्य एकमेकांशी सतत काही न काही मुद्द्यांवर एकमेकांशी बोलताना दिसतात. तर कित्येकदा हेच सदस्य विरुद्ध टीममधील लोकांशी तर काही वेळा आपल्याच टीममधील सदस्यांशी वाद घालत असतात. आता केसांच्या गुंत्यावरुन बी टीममध्ये वादाचा ठिणगी पडली आहे.
नुकतंच बिग बॉस मराठीने एक अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिजीत सावंत, अंकिता वालावालकर आणि पंढरीनाथ कांबळे एकत्र बसल्याचे दिसत आहेत. ते सर्वजण वर्षा उसगावकर यांच्याबद्दल चर्चा करताना पाहायला मिळत आहे. यावेळी अभिजीत म्हणाला, सकाळी मी आणि पॅडी भाऊ आम्ही दोघांनी बाथरुम साफ करण्याचे ठरवले होते. आम्ही काल ठरल्याप्रमाणे मी महिलांचे वॉशरुम साफ करेन आणि पॅडी दादा हे महिलांचे वॉशरुम साफ करतील असे ठरले.
“साफ करायला गेलो तेव्हा तिथे केस पडले होते”
मी महिला बाथरुम साफ करायला घेतलं. त्याआधी मला वर्षा ताई म्हणालेल्या की केसांचा गुंता हा ज्याचा त्याचा त्यानेच काढायला हवा. मी वॉशरुम साफ करायला गेलो. तेव्हा त्या अंघोळीला गेल्या आणि आल्यावर मी साफ करायला गेलो तेव्हा तिथे केस पडले होते.
“मान ठेवून गप्प बसावे”
“मी पॅडी भाऊंना सांगितले की, इथे केस आहेत. तर भाऊ मला म्हणाले की जा तू आणि बोल त्यांना. मी गेलो आणि ताईंना म्हणालो, ताई तिकडे केस आहेत. तर ताई म्हणाल्या,”केस धुतले, पण मी केस बांधले आहेत. माझे नाही ते. तर अभिजीत म्हणाला, ” अजून घरात कोणी अंघोळ केलेली नाही, मग मी कोणाला विचारू..?” ताई म्हणतात , ” हो बरोबर आहे चूक झाली माझी.”
यानंतर मग पॅडी भाऊ पुढे म्हणाले,” मी आलो बाथरूममध्ये केस तिकडे होते. मी उचलेले ते केस आणि म्हणालो सगळ्यांना इथे आता केस आहेत ते मी आता उचलतो. पुढचा वेळी ज्याचे असतील त्याने उचलावे”. यावर अंकिता म्हणाली,” आपण त्यांच्यासोबत सरळ जरी बोललो तरी त्या वाकड्यातच बोलतात. पण ते मनाला खूप लागतं. आपल्याला त्यांचा मान ठेवून गप्प बसावे लागते.” दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आता केसांचा गुंतावरुन नवीन रामायण घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.