Devmanus | ‘देवमाणूस’चं चित्रीकरण पूर्ण, कलाकारांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप! पाहा टीमचा ‘फेअरवेल पार्टी’ फोटो…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 6:53 PM

छोट्या पडद्यावर सध्या सुपरहिट ठरत असलेली देवमाणूस (Devmanus) ही मालिका आता काहीच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचं कथानक आता शेवटच्या टप्प्यात आलं असून, 15 ऑगस्ट रोजी दोन तासांच्या विशेष भागासह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Devmanus | ‘देवमाणूस’चं चित्रीकरण पूर्ण, कलाकारांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप! पाहा टीमचा ‘फेअरवेल पार्टी’ फोटो...
प्रेक्षकांची आवडती देवमाणूस ही मालिका पुढच्या आठवड्यात निरोप घेणार आहे. रविवार 15 ऑगस्ट रोजी दोन तासांचा विशेष एपिसोड हा मालिकेचा शेवटचा भाग असेल. त्यामुळे डॉ. अजितकुमार देवचं काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे

मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या सुपरहिट ठरत असलेली देवमाणूस (Devmanus) ही मालिका आता काहीच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचं कथानक आता शेवटच्या टप्प्यात आलं असून, 15 ऑगस्ट रोजी दोन तासांच्या विशेष भागासह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालीकेच चित्रीकरण पूर्ण झालं. यानंतर आता मालिकेतील सगळे कलाकार आपापल्या घरी परतले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका सुपरडूपर हिट ठरली असून, आता मात्र ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड याने ‘डॉ. अजित कुमार देव’ उर्फ ‘देवी सिंग’ हे मुख्य पात्र साकारलं होतं. या आधी किरण ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत ‘भैय्यासाहेब’ या भूमिकेत दिसला होता. नुकताच या मालिकेतील कलाकारांची फेअरवेल पार्टी पार पडली. या पार्टीचे काही फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

पाहा फोटो :

View this post on Instagram

A post shared by Marathi Serial TRPs Page (@marathiserials_official)

या फोटोमध्ये ‘देवमाणूस’ मालिकेतील सगळे कलाकार आणि आब्कीची टीम देखील दिसत आहे. मालिकेची आठवण म्हणून प्रत्येक सदस्याला एक सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. या सन्मान चिन्हावर खाली झी मराठी वाहिनीचा लोगो असून, वरच्या बाजूला देवमाणूस मालिकेचा मोंटाज आहे. तर यावेळी संपूर्ण टीम मंचावर दिसत असून, वज्र प्रोडक्शनची सर्वेसर्वा अर्थात अभिनेत्री श्वेता शिंदे माईकवर काही तरी बोलताना दिसतेय.

असा होणार मालिकेचा शेवट!

मालिकेचा नवा प्रोमो आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, तो खूप चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.

पाहा प्रोमो :

‘ती परत आलीये’ घेणार ‘देवमाणूस’ची जागा!

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव असणार आहे.

(Devmanus Serial Shooting wrapped up Check out the team’s Farewell Party photo of Devmanus team)

हेही वाचा :

‘तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार की कायम बंदच होणार?’, ‘रात्रीस खेळ चाले 3’ नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला!

‘आम्ही सगळे आता डोंबिवलीचा पासचं काढणार आहोत’, अरुंधतीची मुलं पोहोचली तिच्या भेटीला…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI