‘तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार की कायम बंदच होणार?’, ‘रात्रीस खेळ चाले 3’ नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 12:52 PM

'रात्रीस खेळ चाले 3' साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे.

‘तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार की कायम बंदच होणार?’, ‘रात्रीस खेळ चाले 3’ नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला!
शेवंता

Follow us on

मुंबई : झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale 3) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि अल्पावधीत कोरोनामुळे चित्रिकरणालाच ब्रेक लागला. मात्र, आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

‘रात्रीस खेळ चाले 3’ साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत वाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इतकेच नाही तर, आता शेवंता घायला नाही तर घातच करणार असे देखील म्हटले आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो :

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा…येतेय ‘शेवंता’…’, असे कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज!

बदललेली वेळ आणि नव्या व्यक्तिरेखांचा भरणा या काही करणांमुळे ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांची फारशी पकड घेऊ शकली नव्हती. मात्र, आता कलाकारांसह लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’, ‘पांडू’ या आपल्या आवडत्या पात्रांची प्रेक्षक वाट बघत आहेत. गेल्याच आठवड्यात पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता आणि मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर याने ‘रात्रीस खेळ चाले 3’ लवकरच सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. कोकणात प्रचंड पाऊस सुरु झाल्यामुळे पावसाचा व्यत्यय आला होता, मात्र अण्णा नाईकांची भूमिका साकारणारे दिग्गज कलाकार माधव अभ्यंकर यांनी फेसबुकवर फोटो शेअर करत शूटिंग पुन्हा सुरु झाल्याचं सांगितलं आहे.

पुन्हा रंगणार पाप…शाप… आणि उ:शापाचा खेळ!

एका नाईक आडनावाच्या घराण्याची “रात्रीस खेळ चाले” ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.

हेही वाचा :

घरचं प्रकरण सोडून शमिता शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात! राज कुंद्रा प्रकरणानंतरही शोमध्ये एंट्री करताना म्हणाली…

सोशल मीडिया ट्रेंडचा मोह ‘वहिनीसाहेबांना’ही आवरेना, ‘बसपन का प्यार’वर धनश्री काडगांवकरचे लेकासह ठुमके!

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI