Video | सोशल मीडिया ट्रेंडचा मोह ‘वहिनीसाहेबांना’ही आवरेना, ‘बसपन का प्यार’वर धनश्री काडगांवकरचे लेकासह ठुमके!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 11:29 AM

सोशल मीडिया ट्रेंड आला आणि तो सेलिब्रिटींनी फॉलो नाही केला, असं होणं शक्यच नाही. मग, त्यात मराठी कलाकारही कसे मागे राहतील. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाने गायलेल्या ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ (Bachpan Ka Pyaar) या गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे.

Video | सोशल मीडिया ट्रेंडचा मोह ‘वहिनीसाहेबांना’ही आवरेना, ‘बसपन का प्यार’वर धनश्री काडगांवकरचे लेकासह ठुमके!
धनश्री काडगावकर

मुंबई : सोशल मीडिया ट्रेंड आला आणि तो सेलिब्रिटींनी फॉलो नाही केला, असं होणं शक्यच नाही. मग, त्यात मराठी कलाकारही कसे मागे राहतील. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाने गायलेल्या ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ (Bachpan Ka Pyaar) या गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. याच ट्रेंडची भुरळ आता अनेक मराठी कलाकारांनाही पडली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खाष्ट ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका सकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) हिने देखील हा ट्रेंड फॉलो केला आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या लेकासोबत अर्थ काही महिनेच पूर्ण झालेल्या कबीरसोबत या गाण्यावर एक धमाल व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत धनश्रीचा चिमुकला कबीरही हे गाणं एन्जॉय करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

‘बचपन का प्यार…हे तर करायचंच’ होतं’, असं कॅप्शन देत धनश्रीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. धनश्रीचे चाहते आणि अनेक कलाकार देखील तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय अभिनेत्री!

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘नंदिता’ ही भूमिका साकारत अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. धनश्रीने साकारलेली ‘नंदिता’ प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र, मालिका यशाच्या शिखरावर असतानाच तिने या भूमिकेला अलविदा केला होता. अशावेळी तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, गोड बातमी कळताच प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता. या वर्षीच्या सुरुवातीसच धनश्रीने बाळाला जन्म दिला आहे.

तिने आपल्या बाळाचे नाव ‘कबीर’ असे ठेवले आहे. धनश्री या काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. प्रेग्नंसीच्या काळातले तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. धनश्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटोही खूप चर्चेत आले होते.

धनश्रीची कारकीर्द

‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. आता खऱ्या आयुष्यातही एक नवी भूमिका सशक्तपणे सांभाळण्यास धनश्री तयार झाली आहे.

(Tujhyat Jeev Rangla Fame Actress Dhanashri Kadgaonkar share Bachpan Ka Pyaar reel on social media)

हेही वाचा :

माझं कुटुंब म्हणत जमवला संपूर्ण गोतावळा, ‘राणा दा’च्या नव्या मालिकेचा धमाल प्रोमो पाहिलात का?

‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला ते ‘प्रतिज्ञा’च्या ‘ठाकूर सज्जन सिंह’ने घेतला जगाचा निरोप, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI