AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top 5 News | ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला ते ‘प्रतिज्ञा’च्या ‘ठाकूर सज्जन सिंह’ने घेतला जगाचा निरोप, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी

जर तुम्ही रविवार म्हणजेच 8 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला ते ‘प्रतिज्ञा’च्या ‘ठाकूर सज्जन सिंह’ने घेतला जगाचा निरोप, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी
Top 5 News
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : मनोरंजन विश्वाच्या दृष्टीने कालचा दिवस म्हणजे 8 ऑगस्ट काहीसा मिश्र दिवस ठरला. एकीकडे बिग बॉसच्या नव्या सीझनची धूम सुरु होती. तर, दुसरीकडे ‘प्रतिज्ञा’ फेम अभिनेते श्याम अनुपम यांच्या निधनाचे वृत्त कानी आले. मात्र, जर तुम्ही रविवार म्हणजेच 8 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

‘प्रतिज्ञा’च्या ‘ठाकूर सज्जन सिंह’ने घेतला जगाचा निरोप, अभिनेता अनुपम श्याम यांचे दीर्घआजाराने निधन

लोकप्रिय टीव्ही अभिनेता अनुपम श्याम (Anupam Shyam) यांचे निधन झाले आहे. अनुपम यांनी ‘लाईफ लाईन हॉस्पिटल’मध्ये अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी तब्येतीत सुधारणा दिसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या मृत्यूची माहिती सर्वांना दिली आहे. त्यांनी ट्विट केले, ‘ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, हे जाणून अत्यंत दुःख झाले आहे. चित्रपट आणि टीव्ही उद्योगासाठी हे एक मोठे नुकसान आहे.’

‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?

8 ऑगस्टपासून ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) सुरू होणार आहे. हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात अधिक काळ चालणारा म्हणजेच 6 महिन्यांचा हा सीझन असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू होणार आहे. ओटीटीवर सहा आठवडे लाईव्ह दाखवल्यानंतर, या शोचे काही स्पर्धक सलमान खानच्या ‘बिग बॉस’ हाऊसमध्ये जातील. आजच्या दिवशी 12 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत आणि पहिल्यांदा सलमान खान नाही, तर करण जोहर यावेळी बिग बॉस स्पर्धकांचे स्वागत करताना दिसणार आहे. हा शो पाहण्यासाठी तुम्हाला वूट अॅपची सदस्यता घ्यावी लागेल. तुम्हाला फक्त वूट सिलेक्टवरच्य बिग बॉस ओटीटी पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सदस्यता खरेदी केल्यानंतर, तुम्ही हा शो मोबाईल, लॅपटॉप आणि तुमच्या स्मार्ट टीव्हीवर पाहू शकता.

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!

नव्वदच्या दशकातली ‘टुणूक टुणूक टून’, ‘बोलो ता रा रा..’, ‘हो जायेगी बल्ले बल्ले..’ ही गाणी आजही रसिकांना तितकीच आवडतात आणि ती अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. या उडत्या चालीच्या गाण्यांना आवाज देणारे गायक आहेत ‘दलेर मेहंदी’. आपला गाण्यांमुळे त्यांनी अल्पावधीतच बरीच लोकप्रियता कमावली होती. त्यांची गाणी आजही अनेक कार्यक्रमांत वाजवली जातात.

गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी आपल्या दमदार आवाजाने आमिर खानच्या ‘रंग दे बंसंती’ या चित्रपटाचं मुख्य गाणं अर्थात ‘रंग दे बसंती’ (Rang De Basnti) गायलं होतं. या गाण्याचा एक किस्सा त्यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता.

पहिल्याच दिवशी ‘या’ स्पर्धकाला मोठा झटका! कनेक्शन न मिळाल्याने थेट एलिमिनेशनमध्ये अडकणार!

नव्या ट्विस्ट नुसार बिग बॉस ओटीटीमध्ये प्रत्येक पुरुष स्पर्धकाला एका महिला स्पर्धकाची साथ मिळणार आहे. मात्र, बिग बॉसच्या ओटीटी घरात कोणाशीही कनेक्शन न झाल्यामुळे टीव्ही क्वीन दिव्या अग्रवालला पहिल्याच दिवशी एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. आता तिला प्रेक्षकांची मने जिंकायची आहेत, जेणेकरून त्यांच्या मतांच्या आधारे या शोमध्ये पुढे जाऊ शकते.

किर्ती पूर्ण करू शकेल का आपल्या आई-बाबांचं स्वप्न, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट!

छोट्या पडद्यावर सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. अनोख कथानक आणि त्याच समर्पक चित्रीकरण प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या मालिकेत नवीन वळण आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. मालिकेतील ‘शुभम’ आणि ‘किर्ती’ यांची जोडी प्रचंड गाजत आहे. आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ध्येय गाठण्यासाठी निघालेल्या किर्तीला आयुष्यात लग्न नावाच्या बेडीत अडकावं लागतं.

किर्तीच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने घाईघाईत तिचं लग्न लावून दिलं जातं. आपल्या मुलीने खूप शिकावं आणि पोलीस अधिकार व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. मात्र, तिचं लग्न आता एका अशा घरात झालं आहे, जिथे तिला पुढील शिक्षणाची संधीच मिळाली नाही.

हेही वाचा :

ज्या कंपनीत काम करायचे त्याच कंपनीच्या नावाने गायन पार्टी काढली; गीतकार गौतम संकपाळांचा हा अजब किस्सा वाचाच!

एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी प्रेमकथा, पहिल्याच भेटीत अभिनेत्रीच्या प्रेमात पडला महेश बाबू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.