AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Mahesh Babu | एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी प्रेमकथा, पहिल्याच भेटीत अभिनेत्रीच्या प्रेमात पडला महेश बाबू

चित्रपटांव्यतिरिक्त महेश बाबू त्याची पत्नी आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिच्यामुळे देखील चर्चेत आहे. या दोघांच्या लग्नाला आता 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

Happy Birthday Mahesh Babu | एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी प्रेमकथा, पहिल्याच भेटीत अभिनेत्रीच्या प्रेमात पडला महेश बाबू
महेश बाबू
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 9:21 AM
Share

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आज (9 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. महेश बाबूने आपले शालेय शिक्षण चेन्नईच्या सेंट बेडे अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक विद्यालयातून केले. महेश बाबूसोबत तमिळ अभिनेता कार्ती आणि सूर्याचा भाऊसुद्धा याच शाळेत शिकले. त्याने बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1999मध्ये रिलीज झालेल्या ‘राजाकुमाडू’ चित्रपटात त्याने प्रथम मुख्य अभिनेता म्हणून काम केले. ‘राजाकुमाडू’नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि यशाच्या पायऱ्या चढत राहिला.

चित्रपटांव्यतिरिक्त महेश बाबू त्याची पत्नी आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिच्यामुळे देखील चर्चेत आहे. या दोघांच्या लग्नाला आता 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. नम्रता शिरोडकर पती महेश बाबूपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. पण, वयाची मर्यादा या दोघांच्या प्रेमामध्ये कधीच आली नाही.

कशी झाली पहिली भेट?

नम्रता शिरोडकर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने सलमान खान सोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नम्रता शिरोडकरने 1993 साली ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब पटकावला होता. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची पहिली भेट ‘वामसी’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. हा चित्रपट 2000साली प्रदर्शित झाला होता.

पहिल्या भेटीनंतर नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले आणि चित्रपटाचे शूटिंग संपले तेव्हापर्यंत दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले होते. ‘वामसी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघे प्रेमात पडले असतील, पण त्यांनी मीडियासमोर कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. महेश बाबूनेही नम्रता शिरोडकरसोबतच्या नात्याबद्दल कुटुंबाला सांगितले नाही.

कधी बांधली लग्नगाठ?

महेश बाबूने प्रथम आपल्या बहिणीला त्याच्या आणि नम्रताच्या नात्याबद्दल सांगितले. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केले. यानंतर 10 फेब्रुवारी 2005 रोजी दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाआधीच नम्रता शिरोडकरने ठरवले होते की, ती लग्नानंतर चित्रपट जगताचा निरोप घेईल, म्हणून तिने लग्नापूर्वी तिचे सर्व प्रकल्प पूर्ण केले होते.

सुखी चौकोनी कुटुंब

लग्नाच्या एक वर्षानंतर नम्रता शिरोडकरने मुलगा गौतम याला जन्म दिला. लग्नाच्या तीन वर्षानंतर, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांचे नाते संबंध बिघडल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. परंतु, दोघांनीही याबद्दल कधीही उघडपणे भाष्य केले नाही. यानंतर, नम्रता शिरोडकरने 2012मध्ये मुलगी सिताराला जन्म दिला. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू आता त्यांचे सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

(Happy Birthday Mahesh Babu know about actors love story with Namrata Shirodkar)

हेही वाचा :

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!

मी सुमित राघवनला दत्तकच घेणार होते, असं का म्हणाल्या चिन्मयी सुमित? वाचा भन्नाट किस्सा…

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.